मी दुर्गा: स्वकर्तृत्वाने नाव लौकिकात रंग भरणाऱ्या देवगडमधील शीतल कदम, केक व्यवसायात केली प्रगती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 19:04 IST2025-09-23T19:04:11+5:302025-09-23T19:04:34+5:30

शॉपमध्ये सहा महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला

Sheetal Kadam from Devgad provides employment to women in the cake business | मी दुर्गा: स्वकर्तृत्वाने नाव लौकिकात रंग भरणाऱ्या देवगडमधील शीतल कदम, केक व्यवसायात केली प्रगती

मी दुर्गा: स्वकर्तृत्वाने नाव लौकिकात रंग भरणाऱ्या देवगडमधील शीतल कदम, केक व्यवसायात केली प्रगती

अयोध्याप्रसाद गावकर

देवगड : नवरात्रीचे ९ दिवस नवरंगाचे म्हणून ओळखले जातात. या ९ दिवसांमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी याकडे अलीकडे अवास्तव महत्त्व येत गेले. मात्र, स्वकर्तृत्वाने दशदिशांत स्वत:च्या नाव लौकिकाचे रंग भरणाऱ्या देवगडमधील सेलिब्रेशन्स द केक कॅफेच्या शीतल कदम या आहेत. त्या देवगडमध्ये २३ वर्षे केक बनविण्याचे काम करीत आहेत.

 २३ वर्षांच्या कालखंडानंतर देवगड तालुक्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस आला की, त्या व्यक्तीला शुभेच्छा देण्याआधी केकची ऑर्डर सेलिब्रेशन्स द केक कॅफेच्या मालकीन शीतल कदम यांच्याकडे  दिल्या जातात. यामुळे वाढदिवस आणि शीतल कदम असेच काहीसे समीकरण निर्माण झाले आहे.

२५ वर्षांपूर्वी शीतल कदम यांचा विवाह देवगड व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम यांच्याशी झाला. लग्न झाल्यानंतर त्यांनी व लग्नापूर्वीही त्यांनी नोकरी न करता व्यवसाय करण्याचा मानस बाळगला होता. आपण व्यवसाय करून रोजगार देखील उपलब्ध केला पाहिजे, असा त्यांनी निश्चय लग्नाआधीच केला होता.  

देवगड एसटी स्टॅण्ड समोर सेलिब्रेशन्स द केक कॅफे, असा त्यांचा शॉप आहे. त्यांच्या शॉपमध्ये सहा महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी मुंबई येथे जाऊन कॅट्रिंग बेकरी केकचे प्रशिक्षणही घेतले आहे. आज त्यांनी व्यवसायामध्ये कठिण परिस्थितीमधून जाऊन प्रगती केली आहे.

केकचा व्यवसाय करीत असताना लाखो रुपये भांडवलाची गरज होती. पती शैलेश कदम व देवगडमधील कापड विक्रेते राजाभाऊ कदम सासरे यांच्याकडून आर्थिक मदत न घेता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधून लाखो रुपयांचे कर्ज घेऊन शीतल कदम यांनी आपल्या व्यवसायामध्ये प्रगती केली आहे.

प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या कर्तृत्वाची छाप

असे कोणतेही क्षेत्र नाही ज्या ठिकाणी महिलांनी स्वत:च्या कर्तृत्वाची छाप सोडली नाही. स्वत:चे कुटुंब सांभाळून अनेक महिलांनी ग्रामपंचायत ते राष्ट्रपती पदापर्यंतचा कारभार अत्यंत सक्षमपणे सांभाळला आहे. महिलांना व मुलींना करिअरच्या अनेक वेगवेगळ्या वाटा आहेत. हे दाखविण्याचे काम अशा अनेक महिला करीत आहेत. त्यापैकी एक देवगड तालुक्यातील सेलिब्रेशन्स द केक कॅफेच्या मालकीन शीतल कदम या आहेत.

Web Title: Sheetal Kadam from Devgad provides employment to women in the cake business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.