शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

काळा पैसा रोखण्यासाठी ७ गुप्तचर संस्था स्थापणार

By admin | Updated: January 4, 2015 22:12 IST

काळ्या पैशांच्या व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी तसेच सीमा शुल्काबाबत होणारी फसवणूक रोखण्यासाठी विदेशात ७ गुप्तचर संस्था स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला

माणगाव : माणगाव खोऱ्यात हत्तींकडून चालू असलेल्या नुकसानीबाबत वनविभागाने हत्ती प्रशिक्षण मोहीम राबविण्याची तयारी पूर्ण झाली आहे. या मोहिमेसाठी हत्तींना पकडून ज्या क्रॉलमध्ये बंदिस्त करण्यात येणार आहे, त्या क्रॉलचे काम शनिवारी पूर्ण करण्यात आले आहे. गुंगीची औषधेही वनविभागास प्राप्त झालेली आहेत. त्यामुळे ही मोहीम लवकरात लवकर राबवावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे वनविभागही या मोहिमेची तयारी युद्धपातळीवर करीत आहे. माणगाव खोऱ्यात हत्तींकडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे उत्पन्नाचे साधन असणारे माड हत्ती उन्मळून टाकत आहेत. भातपिकाचीही नासधूस सुरू आहे आणि शेतकऱ्यांच्या जीविताशी खेळही चालविला आहे. त्यामुळेच हत्ती प्रशिक्षण मोहीम राबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी हत्ती हटाव मोहीम हत्तीच्या जिवावर बेतली असल्याने वनविभागाने कर्नाटकातील वनविभागाचे माहूत आणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हत्ती प्रशिक्षण मोहीम निश्चित केली आहे. माणगाव खोऱ्यातील वनविभागाच्या आंबेरी येथील क्षेत्रात निलगिरीच्या भल्यामोठ्या वृक्षांपासून हत्तींना बंदिस्त करण्यासाठीचे क्रॉल बांधण्यात आले आहेत. या क्रॉल बांधणीसाठी कर्नाटक येथील वनविभागाचे माहूत मनवर पाशा यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू असून, क्रेनच्या साहाय्याने भलीमोठी लाकडे वापरण्यात आली आहेत. जेणेकरून हत्ती बिथरला, तरी त्याला या क्रॉलमुळे कोणतीही हालचाल न करता निमूटपणे प्रशिक्षण घेणे भाग पडेल. या क्रॉल बांधणीसाठी वनविभागाचे वनरक्षक वैशाली वाघमारे, वनसेवक गोविंद सावंत, शंकर लाड, रामचंद्र तेली, अशोक कविटकर, यशवंत आगलावे, संतोष इब्रामपूरकर व शंकर पाडावेही कार्यरत आहेत. या क्रॉल बांधणीसाठी मालवण येथून निलगिरी वृक्ष आणण्यात आले आहेत. तसेच क्रॉलच्या बाजूला पाण्याची सुविधा, पुरेसा उजेड, रात्रीच्यावेळी लाईटव्यवस्था, हत्तींसाठीचे खाद्य याची पुरेपूर तयारी करून ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)मोहिमेस विविध स्तरांवरून पाठिंबाहत्तींना बेशुद्ध करून या क्रॉलमध्ये बंदिस्त केले जाणार आहे. त्यानंतर सुमारे चार महिने या हत्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर पर्यटनासाठी या हत्तींचा वापर करण्यात येणार असल्याने वनविभागाच्या या मोहिमेस सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. सध्या माणगाव-बेनवाडी येथे एका टस्कराकडून शेतकऱ्यांच्या माड-बागायतींचे नुकसान केले जात असल्याने नुकसान थांंबविण्यासाठी ही मोहीम लवकरात लवकर राबवावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून केली जात आहे.