तारकर्ली 'इसदा'च्या निविदेत 'स्कुबा'कडे कानाडोळा?, आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था धोक्यात येण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 15:35 IST2026-03-27T15:34:42+5:302026-03-27T15:35:04+5:30

एमटीडीसी धोरणाला हरताळ ?

Serious questions have now arisen regarding the new tender process for the Indian Institute of Scuba Diving and Aquatic Sports in Tarkarli | तारकर्ली 'इसदा'च्या निविदेत 'स्कुबा'कडे कानाडोळा?, आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था धोक्यात येण्याची भीती

तारकर्ली 'इसदा'च्या निविदेत 'स्कुबा'कडे कानाडोळा?, आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था धोक्यात येण्याची भीती

संदीप बोडवे

मालवण : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील स्कुबा डायव्हिंगचे मुख्य केंद्र असलेल्या तारकर्ली येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अॅक्वाटीक स्पोर्ट्स' (इसदा) या संस्थेच्या नवीन निविदा प्रक्रियेबाबत आता गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. एमटीडीसीने सुमारे दहा वर्षांपूर्वी उभारलेली ही जागतिक दर्जाची संस्था केवळ एका 'सेफ्टी ट्रेनिंग सेंटर पुरती मर्यादित ठेवण्याचा घाट घातला जात आहे की काय, अशी शंका तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

गेल्या १० वर्षांत हजारो पर्यटकांना सुरक्षित प्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेचा 'अपघातमुक्त इतिहास' हीच तिची खरी ताकद आहे. मात्र, सध्याच्या निविदा अर्टीमध्ये स्कुबा डायव्हिंग आणि जलक्रीडा क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवाला दुय्यम स्थान देऊन केवळ 'लाईफ सेटिंग' प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे. तांत्रिकदृष्ट्या स्कुबा डायव्हिंगमध्ये रेस्क्यू आणि सीपीआर आधीपासूनच अंतर्भूत असतात, तरीही रेस्क्यू ट्रेनिंगचा अनुभव असलेल्या संस्थेला झुकते माप देण्याचा प्रयत्न सार्वजनिक हिताच्या आड येण्याची शक्यता आहे.

एमटीडीसी धोरणाला हरताळ ?

जागतिक दर्जाचे पर्यटन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे हे एमटीडीसीचे मूळ उद्दिष्ट आहे. मात्र, स्कुबा अनुभव नसलेली संस्था निवडली गेली, तर 'इसदाचे मूळ स्वरूप बदलून ती केवळ एक मर्यादित संस्था बनून राहील. यामुळे आंतरराष्ट्रीय डायव्हर्सना आकर्षित करण्याच्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला मोठा फटका बसू शकतो.

तांत्रिक विसंगती आणि धोका

स्कुबा प्रशिक्षण हे अत्यंत व्यापक असून त्यात अंडरवॉटर रेस्क्यूचा समावेश असतो. याउलट, पारंपरिक लाईफ सेव्हिंग प्रशिक्षणात स्कुबा कौशल्यांचा अभाव असतो. निविदा अटींमधून स्कुबा अनुभव दुर्लक्षित केल्यास एमटीडीसीची गुंतवणूक, अत्याधुनिक उपकरणे धूळ खात पडतील, अशी भीती व्यक्त होत आहे.

अपेक्षित सुधारित उपाय

सार्वजनिक हित आणि संस्थेचा दर्जा टिकवण्यासाठी निविदा अटींमध्ये तात्काळ बदल होणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने किमान १५ ते २० वर्षांचा स्कुबा डायव्हिंग व जलक्रीडा क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणित प्रशिक्षण संस्थेशी संलग्नता है निकष अनिवार्य करण्याची मागणी होत आहे.

Web Title : तारकर्ली आईएसडीए निविदा में स्कूबा की अनदेखी; अंतर्राष्ट्रीय संस्थान खतरे में।

Web Summary : तारकर्ली के आईएसडीए को खतरा, नए टेंडर में स्कूबा अनुभव को दरकिनार किया गया। विशेषज्ञों को डर है कि संस्थान केवल एक सुरक्षा केंद्र बनकर रह जाएगा, जिससे इसकी अंतर्राष्ट्रीय स्थिति और एमटीडीसी के लक्ष्य खतरे में हैं।

Web Title : Tarkarli ISDA tender ignores scuba; international institute faces risk.

Web Summary : Tarkarli's ISDA faces risk as new tender sidelines scuba experience. Experts fear the institute may be reduced to a safety center, jeopardizing its international status and MTDC's goals.