राष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या खजिनदारपदी विक्रम भांगले, पंजाब येथील बैठकीत निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:02 IST2025-12-04T18:01:27+5:302025-12-04T18:02:19+5:30
सावंतवाडीचे सुपुत्र

राष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या खजिनदारपदी विक्रम भांगले, पंजाब येथील बैठकीत निवड
सावंतवाडी : राष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या अध्यक्षपदी कलिकेश नारायण सिंगदेव, सचिव पदी पवनकुमार सिंग तर खजिनदारपदी विक्रम ऊर्फ मेघशाम श्रीपाद भांगले यांची निवड करण्यात आली. या निवडीची अधिकृत घोषणा आज, गुरूवारी पंजाब मोहाली येथे पार पडली. सावंतवाडीचे सुपूत्र भांगले यांची खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडियाची निवडणूक प्रकिया अलिकडेच पार पडली. या निवडणूक प्रकियेनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच असोसिएशनच्या सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी पंजाब मोहाली येथे बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्ष पदी कलिकेश सिंग देव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर उपाध्यक्ष कनवर सुलतान सिंग व सुषमा सिंग तसेच सचिवपदी पवनकुमार सिंग तर सावंतवाडीचे सुपुत्र विक्रम ऊर्फ मेघशाम भांगले यांची खजिनदार पदी निवड करण्यात आली आहे.
तर सहाय्यक सचिव रणदीप मान गौरी मोहंती यांची तर सदस्यपदी शीला कानूनगो, कुमार त्रिपुरी सिंग, अमर जंग सिंग, नील सूडनीक यांची निवड करण्यात आली आहे. त्याच्या या निवडीबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
या निवडीनंतर विक्रम ऊर्फ मेघशाम भांगले यांनी रायफल असोसिएशन कडून देशातील सर्व खेळाडूंना न्याय देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत-जास्त खेळाडू रायफल शूटिंगमध्ये सहभाग व्हावेत यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.