शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सागर सुरक्षा कवच, रेड टीमचे कवच भेदण्यासाठी ब्ल्यू टीम सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 6:12 PM

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर भागात ८ ते ९ नोव्हेंबर या कालवधीत पोलीस प्रशासनाच्या वतीने सागर सुरक्षा कवच मोहीम राबविण्यात येणार आहे. सागरी सुरक्षेचा आढावा घेण्याच्या दृष्टीने पुढील ३६ तासासाठी किनारपट्टी सील करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेचा आढावा मालवण, देवगड, वेंगुर्ले किनारपट्टी तालुक्यात मोहीम राबविणार रेड टीमचे कवच भेदण्यासाठी ब्ल्यू टीम सज्ज

मालवण ,दि. ८ : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर भागात ८ ते ९ नोव्हेंबर या कालवधीत पोलीस प्रशासनाच्या वतीने सागर सुरक्षा कवच मोहीम राबविण्यात येणार आहे. सागरी सुरक्षेचा आढावा घेण्याच्या दृष्टीने पुढील ३६ तासासाठी किनारपट्टी सील करण्यात आली आहे.

बुधवार ८ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ९ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३६ तास ही मोहीम चालणार आहे. पोलीस प्रशासनाच्या रेड व ब्ल्यू टीम मोहिमेत सहभागी होणार असून रेड टीमचे कवच भेदण्यासाठी ब्ल्यू टीम सज्ज झाली आहे.

मालवण व आचरा किनारपट्टीवर राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत पाच अधिकाऱ्यांसह ६४ पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत. मालवण किनारपट्टीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तोंडवळी, आचरा किनारपट्टीवर टेहाळणी मनोरे, समुद्रात दोन स्पीडबोट अशी सुरक्षा कवच मोहीम राबविली जाणार आहे.

प्रमुख रस्ते मार्गावरही नाकाबंदी केली जाणार असून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार मालवण पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जाणार आहे.

सागरी सुरक्षेचा आढावासिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मालवण, देवगड व वेंगुर्ले या किनारपट्टी तालुक्यात प्रामुख्याने ही मोहीम राबविली जाणार आहे. तर किनारपट्टीवरील सर्व पोलीस स्थानके सहभागी होणार आहेत. पोलिसांच्याच रेड टीममधून दहशतवादी वेशात चोरीछुपे पोलीस किनारपट्टीवरील रेड टीमचे सुरक्षा कवच भेदण्याचा प्रयत्न करणार असून यातून सुरक्षेचा आढावा घेतला जाणार आहे. याचा अहवालही वरिष्ठांना द्यावा लागतो. त्यामुळे या मोहिमेला महत्त्व असते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस