शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीतच भरली शाळा

By admin | Updated: September 11, 2014 23:11 IST

अधिकाऱ्यांची आंदोलनाकडे पाठ : वडखोल ग्रामस्थांची नाराजी

वायंगणी : वडखोल शाळेत कायमस्वरुपी मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक मिळण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन छेडले होते. याप्रकरणी प्रशासनाकडून शिक्षक नियुक्ती देण्यास असमर्थता दर्शविली गेल्याने आज गुरुवारी ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या कार्यालयात शाळा भरविली.  याबाबत गटशिक्षणाधिकारी ओरोसल्या गेल्याने व बीडिओ सुट्टीवर असल्याने कोणत्याही अधिकारी या आंदोलकांना भेटला नसल्याने आंदोलक उशिरापर्यंत कार्यालयात थांबून होते. तसेच अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत शिक्षक नियुक्ती होत नाही, तोपर्यंत आंदोलन करत राहणार, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.वडखोल ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसमवेत पंचायत समिती कार्यालयात आंदोलनाला सुरुवात केली असतानाच दाभोस शाळेतील सहाय्यक शिक्षक प्रसाद जाधव यांची वडखोल शाळेत तात्पुरती बदली केल्याने दाभोस शाळेतील मुलांचे नुकसान होत असल्याने दाभोस येथील ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागास निवेदन सादर करत बदली रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे सांगितले.दरम्यान, वडखोल शाळेस कायमस्वरुपी मुख्याध्यापक व सहशिक्षक देण्यात यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी वारंवार गटशिक्षणाधिकारी वंदना वळवी यांच्याकडे मागणी केली होती. तसेच ९ सप्टेंबरपासून शाळेच्याच मैदानावर पालकांनीच शाळा घेत अनोखे आंदोलन केले. त्यावेळी वळवी यांनी तालुक्यातील शिक्षकांची रिक्त पदे जास्त असल्याने कायमस्वरुपी शिक्षक देऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर गुरुवारी ग्रामस्थांनी मुलांसह पंचायत समिती कार्यालयात ठाण मांडत शाळा भरविली. सायंकाळी उशिरापर्यंत गटशिक्षणाधिकारी कामानिमित्त ओरोस येथे गेल्या असल्याने व गटविकास अधिकारी सुट्टीवर असल्याने कोणाचीही आंदोलनकर्त्यांशी चर्चा झाली नव्हती. त्यामुळे वडखोल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. दाभोस ग्रामस्थ शिक्षकाची बदली रद्द होण्यासाठी व वडखोल ग्रामस्थ शिक्षक नियुक्तीसाठी एकाचदिवशी दाखल झाल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांची दिवसभर तारांबळ उडाल्याचीच स्थिती पाहवयास मिळाली. पंचायत समितीच्या ठिय्या आंदोलनात शाळा समितीचे अध्यक्ष जयवंत पालव, मानसी पालव, बाळकृष्ण धुरी, मदन पालयेकर, बाळू परब, आनंद धुरी, समाधान परब, विनोद परब, नारायण पडते, विलास धुरी, रामचंद्र पालव, मनोहर पालव, सिध्देश पालव, दीपक राऊळ, यशवंत परब, प्रसाद पालव, सत्यभामा पालव, आदी पालक व ग्रामस्थांसह विद्यार्थी सहभागी झाले होते. या ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. (वार्ताहर)सभापतींची ग्रामस्थांच्या आंदोलनस्थळी भेट वडखोल ग्रामस्थांच्या आंदोलनाला पंचायत समिती सभापती अभिषेक चमणकर यांनी भेट दिली. त्यांनी होडावडा सुभाषवाडी येथील शाळेतील एका शिक्षकाची वडखोल शाळेत नियुक्ती केली असून दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती २५ सप्टेंबरपर्र्यंत करणार असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. तर दाभोसवाडा शाळेतील शिक्षकांची वडखोल शाळेत केलेली नियुक्ती रद्द करण्यात आल्याचे सभापती चमणकर यांनी स्पष्ट केले आहे.