देवगड तळवडेचे सरपंच गोपाळ रुमडे यांचा भाजपात प्रवेश, नितेश राणे यांनी केले स्वागत
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: January 3, 2024 16:04 IST2024-01-03T16:03:45+5:302024-01-03T16:04:06+5:30
कणकवली: देवगड तळवडे सरपंच गोपाळ सूर्यकांत रुमडे यांनी भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश ...

देवगड तळवडेचे सरपंच गोपाळ रुमडे यांचा भाजपात प्रवेश, नितेश राणे यांनी केले स्वागत
कणकवली: देवगड तळवडे सरपंच गोपाळ सूर्यकांत रुमडे यांनी भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. कणकवली येथे हा पक्षप्रवेश झाला. यावेळी शक्ती केंद्रप्रमुख तथा माजी सरपंच पंकज दूखंडे, गडीताम्हाणे शक्ती केंद्रप्रमुख अमित कदम आदी उपस्थित होते. सरपंच गोपाळ रुमडे हे अपक्ष म्हणून निवडून आले होते.
आमदार नितेश राणे यांच्या कामाचा झंझावात, त्यांची विकास कामाबद्दलची दूरदृष्टी पाहून आपण प्रभावित झालो आहे. देवगड तळवडे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच मी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करत असल्याचे सरपंच गोपाळ रूमडे यांनी सांगितले.