शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

जनतेला विकास हवा असल्यानेच सरपंच निवडी बिनविरोध - नितेश राणे 

By सुधीर राणे | Published: December 08, 2022 5:03 PM

'विरोधकांना एक आकड्याच्या आसपासच राहावे लागेल'

कणकवली : कणकवली तालुक्यातील बिनविरोध निवड झालेल्या भाजपच्या ७ सरपंचांचा आमदार नितेश राणे यांनी ओम गणेश निवासस्थानी सत्कार करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. या निवडीमुळे आता तुमची जबाबदारी वाढली असून, यापुढे अजून जोरात काम करा. तुमच्याकडून गावाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. असे प्रतिपादन आमदार राणे यांनी यावेळी केले. तसेच तालुक्यात भाजपचे १०० ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना आमदार राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५० पेक्षा जास्त ग्रामपंचायतीत भाजपचा विजयी होईल असा विश्वास देखील व्यक्त केला. गेल्या साडेपाच महिन्यांमध्ये बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांनी एकत्रितरित्या केलेल्या कामामुळे लोकांचा आमच्यावर आता विश्वास वाढला आहे. जनतेला विकास हवा आहे. गावचा विकास करायचा असेल तर भाजप शिवाय पर्याय नाही हे या सातही ग्रामपंचायतमध्ये लोकांनी ठरवल्यामुळेच या निवडी बिनविरोध झाल्याचे ते म्हणाले. बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युतीधर्म पाळत एकत्रित निवडणुका लढवत आहे. कणकवलीत विरोधकांना एक आकड्याच्या आसपासच राहावे लागेल अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, वारगाव सरपंच नम्रता शेट्ये, सुरेश साटम (साकेडी), रवींद्र शेट्ये (शीडवणे), प्राजक्ता मुद्राळे (पिसेकामते), समृद्धी नर (करूळ) यांच्यासह या बिनविरोध झालेले सदस्य यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक