कणकवलीत जवानांच्या कृतीला सलाम, नागरिकांकडून जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 12:42 IST2019-02-26T12:38:07+5:302019-02-26T12:42:14+5:30
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने जोरदार हवाईहल्ला करत अतिरेक्यांचा खात्मा केला. या माध्यमातून भारतीय जवानांनी 'पुलवामा' चा बदला घेतला आहे. या कारवाईबाबत जवानांचे अभिनंदन कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करीत ' भारत माता की जय' अशा घोषणा देत जवानांचे मनोधैर्य वाढविण्यात आले. तसेच त्यांच्या या कृतीबद्दल सलाम करण्यात आला.

कणकवली येथे मंगळवारी भारतीय जवानांना समर्थन देत नागरिकांनी जल्लोष केला.
कणकवली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने जोरदार हवाईहल्ला करत अतिरेक्यांचा खात्मा केला. या माध्यमातून भारतीय जवानांनी 'पुलवामा' चा बदला घेतला आहे. या कारवाईबाबत जवानांचे अभिनंदन कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करीत ' भारत माता की जय' अशा घोषणा देत जवानांचे मनोधैर्य वाढविण्यात आले. तसेच त्यांच्या या कृतीबद्दल सलाम करण्यात आला.
कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकात मंगळवारी कणकवलीवासीय एकत्र झाले. त्यांनी जोरदार घोषणा देत जवानांच्या पाकिस्तान विरोधी कारवाईचे समर्थन केले. यावेळी ज्येष्ठ व्यापारी अपीशेठ गवाणकर, शिशिर परुळेकर, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी सचिव महेश नार्वेकर गौरव गवाणकर, चिंटू नार्वेकर, सिध्देश शेट्ये आदी व्यापारी तसेच नागरिक उपस्थित होते.
दरम्यान , सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्य ठिकाणीही नागरिकांनी एकत्र येत जवानांच्या कृतीला समर्थन दिले.तसेच या जवानांबरोबर सर्व भारतवासीय आहेत .असा संदेश या माध्यमातून दिला.