शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ४३ अर्जांची विक्री

By admin | Updated: September 23, 2014 23:55 IST

कुडाळमधून दहा, सावंतवाडी मतदारसंघातून ११ आणि कणकवली मतदारसंघातून २२ अर्ज आतापर्यंत विक्रीस गेले आहेत. बसपच्या जळगाव येथील एका कार्यकर्त्यानेही उमेदवारी अर्ज घेतला आहे.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत मिळून आज, मंगळवारपर्यंत एकूण ४३ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. मात्र, अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज चौथा दिवस होता. अर्ज दाखल करण्यासाठी शनिवारपर्यंत आणखी तीन दिवसांचा कालावधी आहे.कुडाळमधून दहा, सावंतवाडी मतदारसंघातून ११ आणि कणकवली मतदारसंघातून २२ अर्ज आतापर्यंत विक्रीस गेले आहेत. बसपच्या जळगाव येथील एका कार्यकर्त्यानेही उमेदवारी अर्ज घेतला आहे. कुडाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी चार, शिवसेनेचे वैभव नाईक आणि राष्ट्रवादीचे पुष्पसेन सावंत यांनी प्रत्येकी एक, बसपच्या जळगाव येथील नरेंद्र कुमार, मदनलाल खैरनार यांनी प्रत्येकी एक, तसेच बसपचेच जिल्हाध्यक्ष रवींद्र कसालकर यांनी एक, अपक्ष म्हणून देऊ विठ्ठल तांडेल (आडवली-मालवण) यांनी एक आणि स्नेहा केरकर (तारकर्ली) यांनी एक उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडून घेतला आहे.सावंतवाडीतून लढण्यासाठी दहाजणांनी अर्ज खरेदी केले असून, यात मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, काँग्रेसचे सेवादल अध्यक्ष वसंत केसरकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप टोपले, अपक्ष नारायण सावंत, साटेली-भेडशी येथील किशोर लोंढे, हिंदू महासभेचे अजिंक्य गावडे यांनी तीन अर्ज खरेदी केले आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी आज चार उमेदवारी अर्जांची विक्री करण्यात आली.शनिवारी भाजपच्यावतीने व शिवराज्य पक्षाच्यावतीने प्रत्येकी चार अर्ज घेण्यात आले होते. काल, सोमवारी नीतेश राणे यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी दहा अर्ज घेतले होते, तर आज शैलेंद्र नेरकर (मनसे), संदीप भिवा कदम (भारिप), डॉ. अभिनंदन मालंडकर (राष्ट्रवादी) व प्रवीण अनंत पारकर (अपक्ष) यांनी प्रत्येकी एक अर्ज घेतला आहे. मात्र, अद्याप एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. (प्रतिनिधी)