शहरं
Join us  
Trending Stories
1
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
2
'पंतप्रधान मोदी कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाहीत', ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
3
पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सची चांदी, किमान भाडं ₹८५ हजारांच्या पार
4
"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?
5
जैशची नवी 'लेडी आर्मी'! मसूद अजहरचा धक्कादायक खुलासा; मोठ्या कटासाठी ५००० हून अधिक महिलांची भरती
6
साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने?
7
झाडाला मिठी मारता, मग बकरीला का नाही? नितेश राणेंचा पर्यावरणप्रेमींना सवाल; म्हणाले, 'हा भाजपचा कार्यक्रम नाही'
8
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
9
असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील पहिला गोलंदाज ठरला स्टार्क; पाकच्या वसीम आक्रमचा विक्रमही मोडला
10
Mumbai: गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद; विद्यार्थिनींचे उपोषण, एमआयएमचा पाठिंबा!
11
अधिवेशनात विरोधक प्रश्न विचारणार म्हणून जमीन प्रकरणात कारवाईचा दिखावा; विरोधकांचा आरोप
12
बापमाणूस! "मी म्हातारा झालो नाही, पैसे कमवेन, तू फक्त..."; रात्री २ वाजता लेकीचा वडिलांना फोन
13
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
14
VIRAL : १२वीच्या मुलाने गर्लफ्रेंडवर 'अशी' ठेवली पाळत; पद्धत बघून शेजाऱ्यांनाही बसला मोठा धक्का!
15
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
17
सरवणकरांची सून झाली तेजस्विनी लोणारी! शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत बांधली लग्नगाठ
18
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
19
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
20
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीच्या कुशीत मिळणार ग्रामीण पर्यटनाला चालना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 18:09 IST

पर्यटन महामंडळाची ‘होम स्टे’ संकल्पना : नव्या वर्षात पर्यटन व्यवसायात गुंतवणूक करणा-या व्यावसायिकांसाठी फायदेशीर 

-सिद्धेश आचरेकरमालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याला ख-या अर्थाने पर्यटन व्यवसायाने तारले. मनमोहक आणि स्वच्छ निळाशार समुद्र किना-याची भुरळ पर्यटकांना पडू लागली. त्यामुळे गेल्या २० वर्षांचा विचार करता सागरी पर्यटन जोमाने वाढले. अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. मात्र ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन, ऐतिहासिक वास्तू पर्यटन, जंगल सफर आदींकडे दुर्लक्ष झाला. दरवर्षी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर येणारा लाखो पर्यटकांचा ओढा पाहता नयनरम्य, हिरव्यागार ग्रामीण पर्यटनाला चालना देणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जसे समुद्रकिनारी लक्ष केंद्रीत केले तसे आता सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये ‘होम स्टे’ म्हणजेच न्याहारी निवास संकल्पना राबविण्याचे निश्चित केले आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी होम स्टे संकल्पना राबविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे येणाºया काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ग्रामीण भागही पर्यटनदृष्ट्या विकसित होणार आहे. त्यामुळे डोंगर, दºयांच्या पायथ्याशी असलेले खेडेगावांना नवी ओळख मिळणार असून जिल्ह्यासाठी पर्यटन व्यावसायिकांकडून नव्या वर्षाची ‘गुड न्यूज’ असल्याची मानली जात आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुमारे १२१ किमीची नयनरम्य किनारपट्टी लाभली आहे. खासकरून मालवण तालुक्यातील मालवण, तारकर्ली, देवबाग आणि अलीकडच्या काळात आचरा, तोंडवळी, तळाशील वायरी हे किनारे लाखो पर्यटकांनी अक्षरश: गजबजून गेलेले असतात. मालवणात किल्ले सिंधुदुर्ग दर्शनाबरोबरच समुद्राखालील अद्भुत विश्व पाहण्याची संधी सागरी संशोधक तथा स्कुबा डायव्हिंग सेंटरचे प्रमुख डॉ. सागर कुलकर्णी यांनी उपलब्ध करून दिल्याने मालवणसह तारकर्ली देवबागमधील पर्यटन अल्पावधीत वाढले. दरवर्षी पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली. १५ वर्षांपूर्वी हजाराच्या संख्येत येणारे पर्यटक लाखोंच्या संख्येने दाखल होत असल्याची आकडेवारीही उपलब्ध आहे. पर्यटकांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या जाणवू लागली तसेच इतर मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यावर मर्यादा येऊ लागल्या.  ग्रामीण पर्यटनातून अधोरेखित होणार कोकणचे गावपणदेशी विदेशी पर्यटकांना सागरी पर्यटनाबरोबर ग्रामीण पर्यटनाचा मनमुराद आनंद घेता यावा, यासाठी एमटीडीसीने सह्याद्रीच्या कुशीत होम स्टे संकल्पना राबविण्याचा विचार सुरू केल्याने नव्या पर्यटन व्यावसायिकांना रोजगार आणि ग्रामीण पर्यटनाचे नवे दालन खुले होणार आहे. ग्रामीण भागातील संस्कृती, परंपरा तसेच ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी प्रकाशझोतात येण्यास मदत होणार आहे. एमटीडीसीच्या या नव्या प्रयोगाला महाराष्ट्र शासनाकडून ‘कोकण ग्रामीण पर्यटन’ या योजनेचा हातभार मिळू शकतो. कोकणातील अस्सल ढंगाचे ‘गावपण’ याच होम स्टे संकल्पनेतून अधोरेखित होणार आहे.  ग्रामीण पर्यटन रोजगाराचे नवे दालनसह्याद्री पर्वतरांग जैवविविधतेने नटलेली मानली जाते. आंबोलीपासून ते गगनबावडाच्या टोकापर्यंत निरनिराळे बेडूक, सापाच्या विविध प्रजाती, ५००० पेक्षा जास्त फुलझाडे, १३९ प्राण्यांच्या जाती, ५०८ पक्ष्यांच्या जाती व १७९ उभयचर प्राण्यांच्या जाती सह्याद्री पर्वताच्या कुशीत आढळतात. त्यामुळे येणा-या  काळात एमटीडीसीच्या नव्या प्रयोग यशस्वी होण्यासाठी जंगल दर्शन, पक्षी निरीक्षण, साहसी प्रकार आदी निसर्गाशी आणि मालवणी संस्कृतीशी निगडीत असलेले उपक्रम हाती घ्यायला हवेत. सागर किनाºयाबरोबरच कातळशिल्पे, पुरातन लेणी, ऐतिहासिक वास्तू उजेडात येणार रोजगार व व्यवसायाचे नवे पर्व म्हणून ग्रामीण पर्यटनाकडे पाहिले जातेय.

टॅग्स :tourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्ग