शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

रॉकस्टारच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध, सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचा चौथा दिवस : हास्यसम्राटांच्या कॉमेडीने खळखळून हसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 7:01 PM

मोती तलावाचे अप्रतिम सौंदर्य व बोचणाऱ्या गुलाबी थंडीच्या साथीने सारेगम विजेता रॉकस्टार जसराज जोशी यांनी सादर केलेली अंगावर शहारे आणणारी गाणी, हास्यसम्राट के . अजेश, किरण तांबे, दत्ता भेंद्रे यांची सर्वांना खळखळून हसवायला लावणारी धमाल कॉमेडी आणि नृत्याविष्काराने सावंतवाडी पर्यटन महोत्सवात शनिवारी रात्री चांगलीच रंगत भरली. शेवटपर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमाने सावंतवाडीकर मंत्रमुग्ध झाले.

ठळक मुद्दे हास्यसम्राटांच्या कॉमेडीने खळखळून हसविलेसावंतवाडी पर्यटन महोत्सवाचा चौथा दिवस रॉकस्टारच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

सावंतवाडी : मोती तलावाचे अप्रतिम सौंदर्य व बोचणाऱ्या गुलाबी थंडीच्या साथीने सारेगम विजेता रॉकस्टार जसराज जोशी यांनी सादर केलेली अंगावर शहारे आणणारी गाणी, हास्यसम्राट के . अजेश, किरण तांबे, दत्ता भेंद्रे यांची सर्वांना खळखळून हसवायला लावणारी धमाल कॉमेडी आणि नृत्याविष्काराने सावंतवाडी पर्यटन महोत्सवात शनिवारी रात्री चांगलीच रंगत भरली. शेवटपर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमाने सावंतवाडीकर मंत्रमुग्ध झाले.सावंतवाडी पर्यटन महोत्सवात शनिवारी चौथ्या दिवशी मुंबई येथील आदिस क्रिएशन प्रस्तुत रंगारंग हा हिंदी-मराठी गाण्यांचा व कॉमेडीचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवराम राजे यांच्या पुतळ््याला नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

मुख्य कार्यक्रमाची सुरुवात गोवा आयडॉल अक्षय नाईक यांनी कटार काळजात घुसली या चित्रपटातील मन मंदिरा तेजाने उजळून येई सागरा... या मराठी गाण्याने केली. त्यानंतर कोकणची महागायिका विजेती नेहा आजगावकरने तेरे लिये दुनिया छोड दी है, पान खाये सय्या हमारो...ही दमदार गाणी सादर केली. त्याला सावंतवाडीकरांनी टाळ््यांची दाद दिली. मंचावर आलेल्या व्हाईस आॅफ इंडिया फेम रचित अग्रवालने हार्मोनियमवर मेरे मौला मेरे मौला... ही कव्वाली सादर करीत सर्वांची मने जिंकली.

नमस्ते लंडनमधील मै जहा रहूँ मै कही भी रहूँ... हे गाणे सादर केले. बेधडक गाण्यांनी कार्यक्रमात रंगत चढली असतानाच रॉकस्टार जसराज जोशी याचे आगमन झाले. त्याने वंदे मातरम्...हे देशभक्तीपर गाणे गात आपल्या सुरेल आवाजाचे सादरीकरण केले. त्याच्या तेरी दिवानी..., दिल से रे... या गाण्यांवर लोकांनी ठेका धरत वन्समोअरची मागणी केली. त्यानंतर आजा आजा दिल्ली... आणि बत्तमीज ये दिल माने ना... या गाण्यांवर बच्चे कंपनीने धमाल केली.

नेहा आजगावकर आणि अक्षयने सैराटमधील सैराट झालं जी..., अक्षयने घेई छंद मकरंद... हे शास्त्रीय गीत सादर करीत कार्यक्रमात आणखीनच रंगत आणली. रचित अग्रवालने परदा है परदा..., तू माने या ना माने..., साजन मोरे घर आ जाना... आदी गाणी सादर केली. यानंतर आलेल्या हास्य सम्राट के.अजेश, किरण तांबे, दत्ता भेंद्रे यांच्या कॉमेडीने सर्वांना हसविले.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantvadi Police Stationसावंतवाड़ी पोलिस स्टेशन