Sawantwadi's second day of Municipal Corporation's Tourism Festival was a memorable, classical song by Sawantwadi residents. | सावंतवाडी पालिकेच्या पर्यटन महोत्सवाचा दुसरा दिवस ठरला यादगार, शास्त्रीय गायनाने सावंतवाडीवासीय मंत्रमुग्ध

ठळक मुद्देसावंतवाडी पर्यटन महोत्सव २०१७ ची धूमधाम पंडित जयतीर्थ मेवुंडी यांनी सादर केलेल्या गाण्यांनी उपस्थित मंत्रमुग्ध मालवणी सुरांच्या गजाली कार्यक्रमाने सर्वांना हसविले खळखळून

सावंतवाडी : येथील पालिकेच्यावतीने आयोजित पर्यटन महोत्सवाचा दुसºया दिवशी शास्त्रीय नाट्यसंगीत गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या सुरेल व शास्त्रशुध्द गायनाने सावंतवाडीकरांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उपस्थित श्रोत्यांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. एकंदरीत पर्यटन महोत्सवाचा दुसरा दिवस यादगार ठरला.


सावंतवाडी पालिकेने सलग अकराव्या वर्षी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने सावंतवाडी पर्यटन महोत्सव २०१७ ची धूमधाम सध्या शहरात जोरात सुरू आहे. पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय दर्जाची नृत्यांगना स्मृतिरेखा दास यांचा ओडिसी नृत्याचा कार्यक्रम पार झाला.

यावेळी अनेक कलाकारांनी ओडिसा येथील संस्कृती व कला याठिकाणी सादर केली. दरम्यान, पर्यटन महोत्सवाचा दुसरा दिवस सावंतवाडीकरांना मनोरंजनाचा ठरला. पंडित जयतीर्थ मेवुंडी यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एका गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तत्पूर्वी साक्षाकार प्रॉडक्शन प्रस्तुत गाण्याने, मालवणी सुरांच्या गजाली या मालवणी कार्यक्रमाने सर्वांना खळखळून हसविले.

या कार्यक्रमातील कलाकारांनी मालवणी संस्कृतीला आधारीत गाण्याच्या चालीवर कार्यक्रम सादर केले. यामध्ये दशावतार व लग्न आदी प्रकार सादर केले. पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाने संगीत क्षेत्रातील श्रोत्यांना जागेवर खिळवून ठेवले.

मेवुंडी यांच्या गायनातील आलाप व ताना तसेच त्यांना संगीत साथ देणाºया सर्वांनीच आपली छाप पाडली.
कार्यक्रमाच्या सरूवातीला सावंतवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी सर्व कलाकारांचे स्वागत केले. त्यानंतर जोग रागातील साजन मोेरे घर आयो या बंदिशीने पंडित मेवुंडी यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरूवात केली.

भैरवीने कार्यक्रमाची झाली सांगता

पंडित मेवुंडी यांना तबला-निखिला चिंचुरकर, आॅर्गन-अमित पाध्ये, बासुरी-देवप्रिया चटर्जी, हार्मोनियम-अदिती गराटे, पखवाज-प्रथमेश तळवलकर यांनी संगीत साथ दिली. बासुरीवादक देवप्रिया चटर्जी यांनी मेवुंडी यांच्या गाण्याला उत्तम साथ देत सर्वांच्या मनात जागा मिळविली. जयतीर्थ यांनी तराना, तडफे जैसे जलबिन मच्छलिया हे गाणे सादर करतानाच भवानी दयानी या भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली.
 


Web Title: Sawantwadi's second day of Municipal Corporation's Tourism Festival was a memorable, classical song by Sawantwadi residents.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.