शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नितेश राणेंनी माझ्यावर आरोप करणे हास्यास्पद!, अतुल रावराणे यांचा टोला 

By सुधीर राणे | Updated: March 29, 2023 18:09 IST

ठेकेदाराकडून अथवा कामात कमिशन घेऊन व्यवसाय उभे केले नाहीत

कणकवली: आमदार नितेश राणे यांनी माझ्यावर आरोप करणे ही गोष्टच हास्यास्पद आहे. आयकर विभागात नोकरीला असलेल्या आमदारांच्या वडिलांनी १५० कंपन्या कशा काय सुरू केल्या? त्याचे नेमके गमक काय? माझे व्यवसाय हे माझ्या मनगटातील ताकदीवर उभे आहेत. कोणत्याही ठेकेदाराकडून अथवा कामात कमिशन घेऊन मी व्यवसाय उभे केलेले नाहीत. नितेश राणेंमुळेच जिल्हा विकासाला खिळ बसली आहे असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अतुल रावराणे यांनी केला.त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, माझ्यावर टीका करणाऱ्या या स्थानिक आमदाराने कोणाकडून कमिशन मागितले. त्याबाबतचा मागील दहा वर्षाचा लेखाजोखा माझ्याकडे आहे. विकास कामांसाठी स्वतः निधी आणल्याचे हे आमदार सांगतात. मात्र निधी आणण्याची ताकद आणि कर्तुत्व यांच्याकडे नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी आणलेल्या निधीतून  लोणी खाण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.फणसे, पडवणे भागातील आंबा बागायतदारांच्या बागांना आगी लागून नुकसान झाले. मला माहिती मिळताच मी तातडीने तेथे जाऊन पाहणी केली. महावितरणला याबाबत कल्पना देऊन, तलाठ्यांना बोलावून पंचनामा करण्याच्या सूचना केल्या. तसेच त्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा केली. मी हे करत असताना हे आमदार मात्र भूमिपूजन करत फिरत होते. तेथील शेतकऱ्यांनी याबाबत त्यांना विचारल्याने माझा दौरा त्यांना झोंबला. त्याच्यातूनच ते माझ्यावर टीका करत आहेत. स्वतःची पात्रता ओळखामाझी लायकी काढताना अगोदर स्वतःची पात्रता काय ते त्यांनी ओळखावे. आंगणेवाडी येथील सभेत या आमदार व त्यांच्या परिवाराची पात्रता भाजपने दाखवून दिली आहे. शिवसेनेत पक्षाची घटना आहे. त्यानुसार जबाबदारी दिली जाते. त्याला आम्ही बांधील असू. माझ्याकडे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी दिली असून सामान्य कार्यकर्त्याला ताकद देणे, पक्ष संघटना वाढवणे हे माझे काम आहे. शिवसेनेपूर्वी मी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काम केले. भाजपमधील लोक आजही मला सन्मानाने कार्यक्रमाला बोलवतात, मानसन्मान देतात. मात्र, हे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात, तिथे यांना परत कोणीच बोलवत नाही असा टोलाही रावराणे यांनी लगावला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAtul Raverneअतुल रावराणे Nitesh Raneनीतेश राणे