शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या हाकेला प्रतिसाद द्यावा : पाटणे

By admin | Updated: January 29, 2015 00:11 IST

दोन महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सरखेल कान्होजी आंग्रे कोकण रत्न सागरी मोहिमे’ची सांगता भाट्ये येथे झाली.

रत्नागिरी : देशाच्या सीमेवर लष्कर लढत असल्यामुळेच आपण आज सुखाने व शांततेने जगत आहोत. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी युवकांकडे आहे. त्यामुळे, देशाच्या हाकेला युवकांनी साद देणे गरजेचे आहे, असे आवाहन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे यांनी केले.दोन महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सरखेल कान्होजी आंग्रे कोकण रत्न सागरी मोहिमे’ची सांगता भाट्ये येथे झाली. त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी व्यासपीठावर नागपूरचे एनसीसी कमांडिंग आॅफिसर कॅ. तुषार वाळुंजकर, कमांडिग आॅफिसर कर्नल पी. वाय. परबते, रोटरी क्लब, रत्नागिरीचे अध्यक्ष विनायक हातखंबकर, धरमसिंह चौहान आदी उपस्थित होते.कमांडिग आॅफिसर कर्नल पी. वाय. परबते यांनी छात्रसैनिकांना पाण्यातील साहसी व धाडसी वृत्तीला चालना देणे, तसेच त्यांच्यामध्ये विश्वास, शक्ती, मानसिकवृत्ती बळकट करणे व दर्यावर्दी जीवनाचा अनुभव प्राप्त करणे, यासाठी मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.कॅडेट राखी वाल्मिकी (पुणे) हिने सागरी मोहिमेत सहभागी झाल्याने पुलींग, सेलींगसहित नेव्हीचे जीवन, सागरी प्रवासाबरोबर येथील संस्कृती अनुभवयास मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर कॅडेट शिवानी कदम (कोल्हापूर), शिवानी कदम, पूजा राणे (रत्नागिरी), संकेत रामाणी (रत्नागिरी), वरूण डिक्रज, शुभम पोटे (कोल्हापूर), पुष्कराज माने (सावंतवाडी) यांनी आपले मोहिमेतील अनुभव कथन केले.एनसीसी कमांडिंग आॅफिसर कॅ. तुषार वाळुंजकर यांनी सरखेल कान्होजींना भावपूर्ण श्रध्दांजली म्हणून, सागरी मोहिम राबविण्यात आली असल्याचे सांगितले. मोहिमेच्या सुरूवातीच्या दोन दिवसात कॅडेटस्ना प्रचंड त्रास झाला. उंच लाटा, वेगवान वारे याचा सामना करीत कॅडेटनी जुळवून घेतलं. मोहिमेतंर्गत ऐतिहासिक स्थळांना भेटी, स्थानिकांचे राहणीमान जाणून घेणे, पथनाट्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यात आले. सर्व कॅडेटस्, कर्मचारी, अधिकारऱ्यांच्या सहकार्यामुळे मोहीम यशस्वी झाल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)े