शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
2
मुलींसाठी कमालीची आहे 'ही' स्कीम! केवळ व्याजातून होणार ₹४९ लाखांची कमाई, मॅच्युरिटीवर मिळतील ₹७२ लाखांचा फंड
3
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
4
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
5
"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण
6
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
7
VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी
8
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
9
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
10
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
11
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
12
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
13
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
14
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
15
गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक, २ साथीदारांचा शोध सुरू
16
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
17
‘गंभीर’ बट्ट्याबोळ वेळीच आवरा! भारतीय क्रिकेटची अशी पत घालवणे जास्त भयंकर अन् अक्षम्य
18
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
19
पोकळ बडबड करून भाजप, मोदींशी कसे लढता येईल?; कातडीबचाव आघाड्या दूर साराव्या लागतील
20
सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही; माजी राष्ट्राध्यक्षांना २७ वर्षांची शिक्षा, पण का?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली पंचायत समितीच्या ८ जागा महिलांसाठी आरक्षित, सभापती पदासाठी 'या' मतदारसंघात चुरस होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 15:04 IST

दहा माजी पंचायत समिती सदस्याना पुन्हा संधी

कणकवली : कणकवलीपंचायत समितीच्या सदस्य पदासाठी १६ गणांचे आरक्षण आज, सोमवारी जाहीर झाले. त्यामध्ये आठ जागा महिलांसाठी तर आठ जागा पुरुषांसाठी आरक्षित झाल्या आहेत. सभापती पदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला राखीव झाल्याने नांदगाव आणि नाटळ पंचायत समिती गणातील महिला उमेदवार प्रमुख दावेदार ठरणार असल्याने चुरस निर्माण होणार आहे.कणकवली पंचायत समितीच्या सदस्यपदांसाठी येथील तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या दालनात प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थित चिठ्ठयांद्वारे आरक्षण सोडत काढण्यात आली. या प्रक्रियेवेळी नायब तहसीलदार मंगेश यादव, एम. पी. मंडले, सत्यवान माळवे, श्रीराम राणे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.१६ गणांपैकी ८ गण महिलांसाठी राखीव झाले आहेत. महिलांसाठी राखीव झालेल्या गणांपैकी जानवली अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला आहे. या आरक्षणामुळे अनेकांचे पत्ते कट झाले असून नव्यांना संधी प्राप्त झाली आहे. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येनुसार जानवली मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. अनुसूचित जातीच्या जागेसाठी मागील पडलेले आरक्षण पाहून हा मतदारसंघ अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला. त्यानंतर उर्वरित मतदारसंघांपैकी नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात कलमठ, कासार्डे, नांदगाव, नाटळ हे मतदारसंघ नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. ५० टक्के महिला आरक्षणानुसार नागरीकांचा मागास प्रवर्गासाठीसाठी राखीव झालेल्या मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवण्यासाठी चिठ्ठयांद्वारे सोडत काढण्यात आली. यात नांदगाव व नाटळ हे मतदारसंघ नागरीकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहेत. उर्वरित ११ मतदारसंघांतून सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात बीडवाडी, लोरे, हरकुळ बुद्रुक, ओरसगाव, नरडवे हे मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाले आहेत तर फोंडा-करूळ, खारेपाटण, वरवडे, हरकुळ खुर्द, तळेरे, कळसुली हे मतदारसंघ सर्वसाधारणसाठी राखीव झाले आहेत. नव्याने काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतील कणकवली पंचायत समितीच्या २०१७ मधील जवळपास दहा माजी पंचायत समिती सदस्याना पुन्हा संधी प्राप्त झाली आहे तर सहा उमेदवारांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे काही सदस्यांचा हिरमोड झाला आहे. आरक्षण सोडतीसाठी विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. आरक्षण सोडतीच्या चिठ्ठया विद्यामंदिरची विद्यार्थिनी देविश्री पाटील व विद्यार्थी पार्थ तेली यांच्या हस्ते काढण्यात आल्या. येत्या १७ ऑक्टोबरपर्यत आरक्षणावर हरकती नोंदविण्याचे आवाहन तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी केले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kankavli Panchayat Samiti: 8 Seats Reserved for Women, Competition Heats Up

Web Summary : Kankavli Panchayat Samiti's sixteen seats are reserved, with eight for women. The chairperson post is reserved for women from the backward class, creating a competitive environment in Nandgaon and Natal constituencies. New opportunities arise as old members miss out.