शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

सद्गुरु चरणातून खरी सुखप्राप्ती : फरिदाबादी

By admin | Updated: September 7, 2014 23:55 IST

आध्यात्मिक फेरी : निरंकारी मिशनचा उपक्रम

चिपळूण : आज जगातील प्रत्येक मनुष्य सुखी बनू इच्छितो. परंतु, सद्गुरुला शरण गेल्याशिवाय कोणीही खऱ्या अर्थाने सुखी बनू शकत नाही. सुख आणि दु:खाची खरी परिभाषा सद्गुरु शिकवितो. जग ज्या गोष्टीला सुख आणि दु:ख मानते ते सुख अंतिम श्वासाला संपवून जाते. सद्गुरु आत्मा, परमात्माची भेट घालून जन्म मरणाच्या चक्रातून आत्म्याची सुटका करतो आणि खरे सुख प्रदान करतो, असे प्रतिपादन निरंकारी मिशनचे केंद्रीय प्रचारक चन्नी फरीदाबादी यांनी येथे केले.जगाच भलं व्हावं म्हणून संत महापुरुषांनी युगायुगाला मानवासाठी दिव्य संदेश दिले. याच हेतूने प्रेरित होऊन संत निरंकारी मिशन, चिपळूण, खेड, गुहागर या शाखेतर्फे चिपळूण शहरातून अध्यात्मिक जागृती फेरी काढण्यात आली. यानंतर राधाताई लाड सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चन्नी बोलत होते. सद्गुरु देशाचे दर्शन करुन देवाला पाहणारी दृष्टी आपल्या मूळ दृष्टीत टाकतो. वास्तविक निराकार ईश्वराच्या भेटीने मुक्ती प्राप्त होते. परंतु, ईश्वराचे दर्शन करविणाऱ्या सद्गुरुला धर्म ग्रंथाने देवापेक्षा महान म्हटले आहे. जसे तहान लागलेली व्यक्ती पाण्याचे उपकार मानत नाही तर तहान भागवणाऱ्याचे उपकार मानते. ईश्वराने लाखो, करोडोचे शरीर आपल्याला दिले आहे. ज्याचे शरीर चांगले आहे, त्याच्याजवळ सर्व दौलत आहे. परंतु, अशा मानवाचे मन प्रभूच्या स्मरणात लागत नाही आणि हेच मोठे नवल आहे, अशी भावनाही चन्नी यांनी व्यक्त केली. यावेळी क्षेत्रीय प्रबंधक गंगाधर विचारे यांनीही मनोगत व्यक्त केले. चेन्नी कमलेश यांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विजय विचारे यांनी केले. (वार्ताहर)अध्यात्मिक जागृतीद्वारे मिशनचा संदेश, सिद्धांत, समाजकारी आणि भक्ती विचारधारा बॅनर्स, गीते व माहिती चिपळूणवासीयांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या फेरीतील शिस्त, परिधान केलेले अ‍ॅप्रन बॅनर्स, सेवादल वर्दीतील निरंकारी भक्त सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यामध्ये छोट्या बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत निरंकारी भक्त सहभागी झाले होते.