शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

रत्नागिरी : मिऱ्याप्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांनी पत्तनच्या अधिकाऱ्यांना खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 4:38 PM

शासनाकडूनच निधी आला नाही तर गोष्ट वेगळी. पण निधी मंजूर होऊनही तुम्ही दोन दोन वर्षे घालवता. मिऱ्या येथे केलेले काम १६ कोटींचे झाले म्हणता तर मग पंधरा वर्षे त्यात दुरूस्तीच करायला नको होती. पाच वर्षांच्या आतच काम पुन्हा करावे लागले तर कोण देणार निधी, अशा शब्दात जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी पत्तन विभागाच्या अधिकाºयांना आज खडसावले.

ठळक मुद्दे१६ कोटींच्या कामाची ५ वर्षातच वाट? मिऱ्याप्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांनी पत्तनच्या अधिकाऱ्यांना खडसावले

रत्नागिरी : शासनाकडूनच निधी आला नाही तर गोष्ट वेगळी. पण निधी मंजूर होऊनही तुम्ही दोन दोन वर्षे घालवता. मिऱ्या येथे केलेले काम १६ कोटींचे झाले म्हणता तर मग पंधरा वर्षे त्यात दुरूस्तीच करायला नको होती. पाच वर्षांच्या आतच काम पुन्हा करावे लागले तर कोण देणार निधी, अशा शब्दात जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावले.आज मिऱ्यांवासीयांनी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. यावेळी त्यांना निवेदनही देण्यात आले. पत्तन विभाग निद्रिस्त असल्याचा आरोप करतानाच याठिकाणी केवळ दगड टाकण्याचेच काम केले असल्याचे आप्पा वांदरकर यांनी सांगितले.

मिरकरवाडा येथे ब्रेकवॉटरच्या दुसऱ्या टप्प्याच्या अर्धवट कामामुळे संपूर्ण मिऱ्या गाव पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. त्यामुळे पाहाणी करावी, अशी विनंतीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी याबाबत पत्तन अधिकाऱ्यांकडे विचारणा करता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. येथील काम का रेंगाळले, यावर या अधिकाऱ्यांनी यासाठी निधी मिळाला होता. मात्र, डिसेंबर २०१६पासून कंत्राटदार न मिळाल्याने काम रेंगाळल्याचे सांगितले.

शासनाने निधी देऊन दीड वर्ष झाले. पैसे देऊनही काम नाही, मग काय करत होतात? अशा शब्दात प्रदीप पी. यांनी या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. कामासाठी रस्ता मिळत नाही, ग्रामस्थ काम करू देत नाहीत, अशी कारणे या अधिकाऱ्यांनी सांगताच, याबाबत आपण लोकशाही दिनात किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार का केली नाहीत, असे विचारले.

पंधरामाड येथील बंधाºयासाठी १६ कोटीचा खर्च झाला. एवढा खर्च होऊन केवळ पाच वर्षातच ते काम परत करावे लागत असेल तर त्याचा उपयोग काय, असेही प्रदीप पी. म्हणाले.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय सालीम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हा धोका मिरकरवाडा येथील ब्रेकवॉटरमुळे झाल्याचे निदर्शनास आणून देऊन त्यावर उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यावर प्रदीप पी. यांनी प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले यांना हे काम २००५च्या आराखड्यानुसार झालेले असले तरी त्याची रचना चुकीची झालेली आहे, की कामच झालेले नाही, याबाबत एखाद्या तंत्रज्ञाकडून माहिती घ्या तसेच मिरकरवाडा येथील या बंधाऱ्याचा अभ्यास होणे गरजेचे असल्याने तसे त्वरित सर्वेक्षण करण्यासाठी डब्ल्यूपीआरएस संस्थेला सांगा, अशा सूचना दिल्या.

टॅग्स :Mirkarwada Bandarमिरकरवाडा बंदरRatnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी