शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी एपीएलधारक धान्यापासून वंंचित

By admin | Updated: August 25, 2014 22:52 IST

गणेशोत्सव तोंडावर : काळ्या बाजाराने धान्यखरेदीची वेळ

रत्नागिरी : गणेशोत्सवाला आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, अजूनही एपीएल शिधापत्रिकाधारकांचे आॅगस्ट महिन्याचे धान्य आले नसल्याने त्यांना या सणासाठी काळ्या बाजाराने धान्य खरेदी करावे लागणार आहे. सध्या जिल्ह्यातील एपीएलधारकांची संख्या ९८,१९३ इतकी आहे. त्यांच्यासाठी दर महिन्याला ५६४ मेट्रिक टन गव्हाची आणि ४६१ मेट्रिक टन तांदळाची मागणी असते.केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेच्या अंमलबजावणीचा लाभ केवळ दारिद्र्यरेषेखालील लोकांना मिळत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीला फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. मात्र, एपीएलधारकांना अनियमित धान्यपुरवठा होत आहे. त्यामुळे त्यांच्यामधून नाराजी व्यक्त होत आहे. अन्न सुरक्षा योजनेला प्रारंभ झाल्यानंतर एपीएलधारकांना तीन महिने धान्याची प्रतीक्षा करावी लागली होती. त्यानंतरही जुलै महिन्यापर्यंत धान्यपुरवठा करण्यात आला.मात्र, आता आॅगस्टच्या शेवटी गणेशोत्सवाला प्रारंभ होेत आहे. अन्नसुरक्षा योजनेच्या प्राधान्य गटाला सप्टेंबरपर्यंतचा धान्यसाठा मंजूर करण्यात आला आहे. एपीएल शिधापत्रिकाधारकांसाठी अजूनही आॅगस्ट महिन्याचे नियतन मंत्रालयातच मंजूर होऊन आलेले नाही. गणेशोत्सवाला केवळ चार दिवस उरले आहेत. त्यामुळे सण कसा साजरा करणार, असा सवाल केला जात आहे. दरम्यान, आतापर्यंत धान्यच उपलब्ध झाले नसल्याने एपीएलधारकांना काळ्या बाजाराने धान्य खरेदी करावे लागत असल्याने त्यांच्यामधून नाराजी व्यक्त होत आहे.ऐन गणेशोत्सवात अन्नधान्याच्या किमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना रास्त दराच्या दुकानाचा मोठा आधार ठरत होता. मात्र धान्यच न आल्याने या कार्डधारकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आता उर्वरित एकदोन दिवसात तरी धान्य पदरात पडणार का? असा सवाल कार्डधारकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)े