शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

राणेंनी निवडणुकीला २०२४ मध्ये उभे राहून दाखवावेच -वैभव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 7:04 PM

NarayanRane, shiv sena, bjp, vaibhavnaik, sindhdurugnews नारायण राणे शिवसेनेला आव्हान देतात आणि त्यानंतर स्वतःच बाजूला होतात. २०१९ च्या निवडणुकीतून राणेंनी असेच केले होते. परंतु २०२४ च्या निवडणूकित राणेंनी उभे राहून दाखवावे असे आव्हान आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना दिले आहे.

ठळक मुद्देराणेंनी निवडणुकीला २०२४ मध्ये उभे राहून दाखवावेच -वैभव नाईकराणेंनी शिवसेनेवर केलेल्या टिकेला आमदार वैभव नाईक यांचे प्रतिउत्तर

कणकवली : नारायण राणे शिवसेनेला आव्हान देतात आणि त्यानंतर स्वतःच बाजूला होतात. २०१९ च्या निवडणुकीतून राणेंनी असेच केले होते. परंतु २०२४ च्या निवडणूकित राणेंनी उभे राहून दाखवावे असे आव्हान आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना दिले आहे.नारायण राणेंनी शिवसेनेवर केलेल्या टिकेला आमदार वैभव नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिले आहे. या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, नारायण राणेंनी शिवसेना संपविण्याची जेव्हा जेव्हा भाषा केली त्यानंतर शिवसेना आजवर पहिल्या पेक्षा दुप्पटिने वाढली आहे.

शिवसेनेचा आता मुख्यमंत्री देखील आहे. राणेंनी दिलेले आव्हान शिवसेनेने २०१४ सालीच मोडून काढले आहे. २०१४ मध्ये राणेंचा पराभव माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाने केला. त्याचबरोबर त्यांच्या मोठ्या मुलाचा देखील सलग २ वेळा शिवसेनेने पराभव केला.

राणेंना माहितच असेलच गेल्या निवडणुकीत त्यांचा छोटा मुलगा पक्ष बदलून भाजपा मधून उभा राहिला नसता तर तोही पराभूत झाला असता. राणें २०१९ च्या निवडणुकीतही स्वतः उभे राहिले नाहीत.त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत राणेंनी उभे राहून दाखवावे. तसे झाले तर कोकणातून शिवसेनेचे ११ आमदार येतात की २१ ते त्यांना त्यावेळी कळेल. असेही या प्रसिध्दीपत्रकात वैभव नाईक यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणVaibhav Naikवैभव नाईक Shiv SenaशिवसेनाNarayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग