शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

कणकवलीत जुगार अड्ड्यावर छापा , ४ जणांसह २० हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 4:40 PM

कणकवली शहरातील रेल्वे स्टेशन नजीक ३ पत्ती जुगारावर पोलिसांनी छापा टाकत २० हजार ८२० रुपयांच्या रोख रक्कमेसह मोबाईल फोन जप्त केले. जुगार प्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवार रात्री ९ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

ठळक मुद्देकणकवलीत जुगार अड्ड्यावर छापा कारवाईत ४ जणांसह २० हजारांचा मुद्देमाल जप्त

कणकवली : शहरातील रेल्वे स्टेशन नजीक ३ पत्ती जुगारावर पोलिसांनी छापा टाकत २० हजार ८२० रुपयांच्या रोख रक्कमेसह मोबाईल फोन जप्त केले. जुगार प्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवार रात्री ९ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.कणकवलीत सोमवारी पोलिसांना जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कणकवली रेल्वे स्टेशननजीक ३ पानी जुगार सुरु होता. जुगारावर छापा टाकल्यानंतर ४ जण जुगार खेळताना रंगेहात सापडले.यावेळी संशयित आरोपी प्रकाश शिंदे उर्फ सावकार (रा. कणकवली), नारायण चंद्रकांत आंगणे (रा. गोठणे, ता. मालवण), यश उध्दव घाडीगांवकर (रा. बांधकरवाडी, कणकवली) , सूरज यशवंत सुर्वे (रा. परबवाडी, कणकवली) या चौघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले, महिला पोलीस हवालदार ममता जाधव, कॉन्स्टेबल किरण मेथे, चालक कॉन्स्टेबल माने यांच्या पथकाने केली.याबाबत पोलीस नाईक किरण कृष्णात मेथे यांनी तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार ममता जाधव करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग