शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

आंबोली घाटातील स्टॉल्सचा प्रश्न निकाली, शिवसेना-भाजपचे पदाधिकारी आले धावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 16:39 IST

वनविभागाने अंधाराचा फायदा घेत दोन दिवसांपूर्वी आंबोली घाटातील स्टॉल्स तोडून टाकत आतील सामान घाटात फेकून दिले होते. या विरोधात भाजप- शिवसेनेच्यावतीने उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना जाब विचारताच स्टॉल पुन्हा एकदा लागले आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यानी स्टॉलधारकांना एकत्र केले, तर राजन तेलींच्या माध्यमातून वनमंत्र्यांनी हा प्रश्न निकाली काढला आहे.

ठळक मुद्देआंबोली घाटातील स्टॉल्सचा प्रश्न निकाली शिवसेना-भाजपचे पदाधिकारी आले धावून

सावंतवाडी : वनविभागाने अंधाराचा फायदा घेत दोन दिवसांपूर्वी आंबोली घाटातील स्टॉल्स तोडून टाकत आतील सामान घाटात फेकून दिले होते. या विरोधात भाजप- शिवसेनेच्यावतीने उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना जाब विचारताच स्टॉल पुन्हा एकदा लागले आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यानी स्टॉलधारकांना एकत्र केले, तर राजन तेलींच्या माध्यमातून वनमंत्र्यांनी हा प्रश्न निकाली काढला आहे.आंबोली घाटात गेली अनेक वर्षे आंबोली, चौकुळ ग्रामस्थ स्टॉल लावतात. यातून येणाऱ्या पर्यटकांना जागेवरच खाद्य मिळते. त्यामुळे स्टॉलधारकांना रोजगारही मिळतो. तसेच पर्यटकांची पायपीटही थांबते. पण गेली दोन वर्षे वनविभागाचे अधिकारी या स्टॉलवर हातोडा फिरवित आहेत.

ऐन पावसाच्या तोंडावर या स्टॉलधारकांचा व्यवसाय होत असतो. त्याचवेळी वन विभागाला जाग येत असते. गेल्या वर्षीही असाच प्रकार झाला होता. त्यावेळीही वनविभागाला जाब विचारताच त्यांनी स्टॉलधारकांपुढे नमते घेत पुन्हा स्टॉल उभारणीस परवानगी दिली होती.मात्र, दोन दिवसांपूर्वी वन विभागाचे काही अधिकारी अंधाराचा फायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास स्टॉलवर गेले आणि सर्व स्टॉल्स कटरने तोडून टाकले. यात किमती ताडपत्री तसेच हॉटेलमधील सामान होते. हे सर्व सामान दरीत फेकून दिले. तसेच पुन्हा स्टॉल लावल्यास पुन्हा तोडून टाकू, अशी धमकी दिली. त्यामुळे स्टॉलधारक दोन दिवस शांत होते. मात्र, दोन दिवसांनंतर भाजपचे तालुकाध्यक्ष महेश सारंग हे आंबोलीत गेले. त्यांनी यातील काही स्टॉलधारकांना धीर दिला आणि त्यांना सावंतवाडीत आणत उपवनसंरक्षकांची भेट घालून दिली.त्याचवेळी तेथे भाजपचे माजी आमदार राजन तेली, शिवसेनेचे रुपेश राऊळ, राघोजी सावंत, शब्बीर मणियारही दाखल झाले. या सर्वांनी उपवनसंरक्षक चव्हाण यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही चव्हाण यांना स्टॉलधारकांचा प्रश्न सोडवा, असे आदेश दिल्यावर लागलीच प्रश्न मार्गी लागला. त्यानंतर स्टॉलधारक आंबोली येथे गेले. त्यांनी आपले स्टॉल पूर्ववत लावले आहेत. आता या स्टॉलधारकांची यादी उपवनसंरक्षकांनी बनवली असून, त्याप्रमाणेच हे स्टॉल लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, सारंग यांनी या स्टॉलधारकांना एकत्र केले नसते तर यावर तोडगाच निघू शकला नसता, असे स्टॉलधारकांनी सांगितले. 

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग