कणकवलीत कार्यकारी अभियंत्यांकडून उड्डाणपुलाच्या दर्जाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 04:55 PM2020-08-10T16:55:09+5:302020-08-10T16:55:34+5:30

कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाची तपासणी करण्याची मागणी वारंवार केली जात होती. यामुळे शहरातील उड्डाणपुलाची तपासणी कार्यकारी अभियंता सलीम शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.

Quality inspection of flyover by executive engineers at Kankavali | कणकवलीत कार्यकारी अभियंत्यांकडून उड्डाणपुलाच्या दर्जाची पाहणी

शहरातील उड्डाणपुलाची तपासणी कार्यकारी अभियंता सलीम शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

Next
ठळक मुद्देकणकवलीत कार्यकारी अभियंत्यांकडून उड्डाणपुलाच्या दर्जाची पाहणी

कणकवली : शहरात महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाची तपासणी करण्याची मागणी वारंवार केली जात होती. यामुळे शहरातील उड्डाणपुलाची तपासणी कार्यकारी अभियंता सलीम शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.

बॉक्सवेलला पडलेले भगदाड आणि उड्डाणपुलाचा कोसळलेल्या साईड स्लॅबनंतर जनतेच्या मनात महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याच मागणीसाठी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनीही उपोषण छेडले होते. यामुळे शहरातील उड्डाणपुलाची तपासणी कार्यकारी अभियंता सलीम शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.

यावेळी महामार्ग कार्यकारी अभियंता सलीम शेख यांच्यासह उपअभियंता पोवार, आरटी फॅक्ट कंपनीचे एन. के. सिंग, डीबीएलचे प्रोजेक्ट मॅनेजर गौतम, डीबीएलचे परिहार, उदय चौधरी उपस्थित होते.

अखेर शनिवारी नॅशनल अ‍ॅक्रिडेशन ब्युरो आॅफ टेस्टिंगची मान्यताप्राप्त असलेल्या बालाजी टेस्ट हाऊस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कणकवली शहरातील जानवली नदीपूल ते गडनदी पुलादरम्यान बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे खांब आणि स्लॅबची तपासणी केली. रिबाऊंड हॅमर अल्ट्रासोनिक पर्ल्स व्हॅलोसिटी तंत्राद्वारे ही तपासणी करण्यात आली आहे.

 

Web Title: Quality inspection of flyover by executive engineers at Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.