Punitive action on illegal sand transport, Kankavali tahsildar action | अवैध वाळू वाहतुकीवर दंडात्मक कारवाई,कणकवली तहसीलदारांची कारवाई
अवैध वाळू वाहतुकीवर दंडात्मक कारवाई,कणकवली तहसीलदारांची कारवाई

ठळक मुद्देअवैध वाळू वाहतुकीवर दंडात्मक कारवाईकणकवली तहसीलदारांची कारवाई

कणकवली : कणकवली तालुक्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़. कणकवली पोलिसांनी गस्तीदरम्यान तपासणी करीत असताना दोन वाहनांना पकडले होते़.

या ट्रकमधून अवैध वाळू वाहतूक करण्यात आली होती़ ही वाहने पकडून पोलिसांनी महसूल विभागाला कळविले़ त्यानुसार रात्री संबंधित ट्रकमधून वाहतूक करण्यात येणारा अवैध वाळूचा मंडल अधिकारी, तलाठी यांनी पंचनामा केला़.

पंचनाम्यानुसार दोन्ही ट्रकवर १ लाख ३६ हजार ७२ रुपयांची विनापरवाना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़. ही कारवाई कणकवली तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या प्रकारामुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Punitive action on illegal sand transport, Kankavali tahsildar action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.