शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या माहितीबाबत जनतेच्या मनात चीड

By admin | Updated: October 1, 2014 00:47 IST

मतदारांचा अपेक्षाभंग : नीतेश राणे यांचा प्रमोद जठार यांच्यावर आरोप

कणकवली : प्रस्थापित आमदारांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात कोणतेही विकासकाम केले नाही. त्यांनी छापलेले प्रगतीपुस्तकच सध्या आमच्यासाठी प्रचाराचा प्रमुख मुद्दा असून प्रगतीपुस्तकातील कामे हा निव्वळ खोटारडेपणा आहे. गावागावात आम्ही भेटल्यानंतर लोकच सांगत आहेत की सन २00९ च्या निवडणुकीपूर्वी या आमदारांना कुठेतरी पाहिले होते, ते आता पुन्हा उमेदवार म्हणून समोर येत आहेत. त्यामुळे खोटी माहिती प्रगती पुस्तकात छापल्याबद्धल जनतेच्या मनात चीड आहे. तो राग जनता मतपेटीतूनच दाखवून देईल, असा विश्वास काँग्रेसचे कणकवली मतदारसंघातील उमेदवार नीतेश राणे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.कणकवली मतदारसंघातील कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तिन्ही तालुक्यात प्रचाराचा पहिला टप्पा नीतेश राणे यांनी पूर्ण केला. त्यानिमित्ताने ‘लोकमत’संवाद साधताना नीतेश राणे म्हणाले, निवडणूक ही लोकांचा विश्वास मिळविण्याची प्रक्रिया आहे. पाच वर्षात लोकप्रतिनिधी म्हणून मोठी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावयाची असते. मात्र, विद्यमान आमदार त्यामध्ये फेल झाले आहेत. सामान्य मतदारांचा यामुळे मोठा अपेक्षाभंग झाला आहे. ज्या उमेदीने २00९ साली आमदारांना निवडून दिले त्याच्या एक टक्काही विकासकामांबाबतची अपेक्षा पूर्ण न झाल्याची भावना सामान्य मतदारांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे कुठल्याही पोपटपंचीला बळी न पडण्याचा निर्णय जनतेने घेतल्याचे त्यांच्याशी भेटल्यावर जाणवत आहे. लोकांच्या समस्या जाणून घेणारा, हक्काचा, कोणत्याही क्षणी भेटणारा व विकास करून घेणारा आमदार निवडून देण्याची भावना लोकांमध्ये आहे.या निवडणुकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांसहीत पक्षाच्या सामान्य बुथ अध्यक्ष असलेल्या कार्यकर्त्याला तेवढेच महत्त्व दिले जात आहे. आपली रणनिती ठरविताना त्या कार्यकर्त्याला विश्वासात घेण्यात आले आहे. त्यामुळे तो आपल्या विजयासाठी ते १00 टक्के मेहनत करताना दिसत आहे. तसेच या कार्यकर्त्यांचा यावेळी नारायण राणेंशी थेट संपर्कदेखील असल्याने यावेळी इतर निवडणुकांपेक्षा वेगळे निर्णय दिसतील. सन २0१९ साली मी माझे प्रगती पुस्तक काढेन तेव्हा जनतेला चीड नाही तर अभिमान वाटेल की, दिलेला प्रत्येक शब्द आपल्या हक्काच्या आमदाराने पाळला आहे. असे चित्र मी घडवून दाखविन, असे आवाहन आपण जनतेला करत आहे. या आवाहनाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नीतेश राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)