प्लाझ्मा थेरपी मशीनसाठी २५ लाखांच्या निधीची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 03:29 PM2021-05-12T15:29:57+5:302021-05-12T15:31:58+5:30

CoroanVirus Sindhudurg Uday Samant : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक आहे. त्यामुळे पुढील धोका लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० खाटांचे कोविड सेंटर उभे करण्यासंदर्भात हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच प्लाझ्मा थेरपी मशीनसाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.

Provision of Rs. 25 lakhs for plasma therapy machine | प्लाझ्मा थेरपी मशीनसाठी २५ लाखांच्या निधीची तरतूद

प्लाझ्मा थेरपी मशीनसाठी २५ लाखांच्या निधीची तरतूद

Next
ठळक मुद्देप्लाझ्मा थेरपी मशीनसाठी २५ लाखांच्या निधीची तरतूदजिल्ह्यात ५० खाटांचे कोविड सेंटर उभारणार- उदय सामंत यांची माहिती

ओरोस : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक आहे. त्यामुळे पुढील धोका लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० खाटांचे कोविड सेंटर उभे करण्यासंदर्भात हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच प्लाझ्मा थेरपी मशीनसाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्याची गरज ओळखून विविध सुविधा निर्माण केल्या जात आहेत. कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी अतिशय घातक आहे. याचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात ५० खाटांचे कोविड सेंटर उभे करण्यासंदर्भात हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या कोविड सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या लहान मुलांना अत्यंत चांगल्या पद्धतीने घरच्यासारखी वागणूक दिली जाईल, असे यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, प्लाझ्मा थेरपीचे मशीन जिल्ह्यासाठी देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर २५ लाख रुपयांची तरतूद या मशीनसाठी केली आहे. आता या थेरपीबाबत मतमतांतरे असली तरी त्याचा फायदा भविष्यात जिल्ह्यातील रुग्णांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री सामंत म्हणाले, लॉकडाऊनला प्रतिसाद दिला त्या जिल्हावासीयांचे आपण आभारी आहोत. त्याचा फायदा जिल्ह्यातील रुग्ण कमी होण्यास होत आहे. त्यामुळे निश्चितच कोविड रुग्णांची वाढलेली संख्या भविष्यात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने माझा सिंधुदुर्ग - माझी जबाबदारी अशी मोहीम राबविण्यात आली होती.

या मोहिमेअंतर्गत २ लाख ९० हजार १२ लोकांपर्यंत जाऊन त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ५६ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा तत्काळ उपचार करण्यासाठी झालेला आहे. ही मोहीम आतापर्यंत ४० टक्के पूर्ण झाली असून, ६० टक्के लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. लवकरच याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

लसीचा तुटवडा भासणार नाही

लसीचा तुटवडा आता भासणार नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करीत मंत्री सामंत यांनी सिंधुदुर्गचा मृत्युदर कमी करण्यासाठी आमचे जिल्हा प्रशासन म्हणून प्रयत्न आहेत, असे सांगितले. आगामी काळात शिक्षकांना व फ्रंटलाइनवर काम करणाऱ्यांना लसीकरण करण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. लॉकडाऊन वाढणार का? याबाबत विचारले असता त्यांनी अद्यापपर्यंत आपण त्यावर काही भाष्य करू शकत नाही, असे सांगून अधिक बोलणे त्यांनी टाळले.

Web Title: Provision of Rs. 25 lakhs for plasma therapy machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.