शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेसाठी ३२४४ कोटींची तरतूद, सोमवारपासून भूसंपादन; मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 11:58 IST

रेल्वे मार्गासह मच्छीमार आणि बागायतदारांच्या उन्नतीसाठी ठोस पावले उचलण्यात आली

​कणकवली : केंद्रीय अर्थसंकल्पात कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून, प्रलंबित कोल्हापूर-वैभववाडीरेल्वे मार्गासह मच्छीमार आणि बागायतदारांच्या उन्नतीसाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत, अशी माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. कणकवली येथील 'ओम गणेश' निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.​राणे म्हणाले, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या तरतुदींमुळे कोकणच्या अर्थकारणाला मोठी गती मिळणार आहे. विशेषतः कोल्हापूर-वैभववाडी या ६,५०० कोटींच्या रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकार ५०-५० टक्के खर्च उचलणार असून, ३,२४४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया ९ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे नियोजन असून, २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा मार्ग कोकणला थेट पश्चिम महाराष्ट्राशी जोडून व्यापाराचे नवे दालन उघडेल.​मत्स्यव्यवसाय आणि किनारपट्टीच्या विकासावर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, ५०० नवीन तलावांची निर्मिती आणि खोल समुद्रातील मासेमारी करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मच्छीमारांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. तसेच नारळ संवर्धन योजनेच्या माध्यमातून फळ उत्पादनाला नवी दिशा मिळणार असून, बागायतदारांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. पर्यटन वाढीसाठी जलवाहतूक आणि 'सी-प्लेन' निर्मितीसाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

रेल्वे प्रकल्पाचा वेग

  • ​प्रकल्प: कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग.
  • ​तरतूद: ३,२४४ कोटी रुपये.
  • ​भूसंपादन: ९ फेब्रुवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ.
  • ​लक्ष्य: २०२८ पर्यंत रेल्वे धावणार.

मच्छीमारांना दिलासा

  • ​खोल समुद्रातील मासेमारी आता 'करमुक्त'.
  • ​मासळी साठवणुकीसाठी पुरवठा साखळी (Supply Chain) मजबूत करणार.
  • ​५०० नवीन मत्स्य तलावांच्या निर्मितीला मंजुरी.

कृषी व पर्यटन

  • ​'नारळ संवर्धन' योजनेतून बागायतीला उभारी.
  • ​सी-प्लेन (Sea Plane) आणि जलवाहतुकीसाठी विशेष निधी.
  • ​बंदरांच्या विकासासह जहाज बांधणी उद्योगाला प्राधान्य.

पालकमंत्र्यांचा विश्वास"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कोकणाला भरभरून दिले आहे. पुढील चार वर्षांत या प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट होईल आणि स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील."

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur-Vaibhavwadi Railway Project Receives Funding; Land Acquisition Starts Soon.

Web Summary : The Kolhapur-Vaibhavwadi railway project gets ₹3244 crore. Land acquisition starts February 9th, aiming completion by 2028. Fishermen benefit from tax exemptions, new ponds. Coconut farming gets boost, plus funding for sea planes. Development will boost the Konkan economy.