शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शिरोडा रूग्णालयात समस्या

By admin | Updated: July 19, 2015 23:43 IST

सेवा द्या अन्यथा उपोषण : युवक काँग्रेसने दिला आंदोलनाचा इशारा

शिरोडा : शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालय विविध समस्यांनी ग्रासले आहे. या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असून रुग्ण वैद्यकीय सेवेपासून वंचित राहत आहेत. या रुग्णालयात अनेक आवश्यक सुविधांची कमतरता आहे. या समस्यांची सोडवणूक येत्या पंधरा दिवसांत न झाल्यास १० आॅगस्ट रोजी शिरोडा युवक राष्ट्रीय काँगे्रसने उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा येथे उपोषण करण्याचा इशारा शिरोडा शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धेश परब यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदनाद्वारे दिला आहे. शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात शिरोडा पंचक्रोशीतील सुमारे दहा ते पंधरा गावातील रुग्ण वैद्यकीय उपचारांसाठी, विविध चाचण्यांसाठी येत असतात. मात्र, रुग्णालयात बऱ्याच सुविधांची कमतरता असल्याने रुग्णांना गोवा, सावंतवाडी, कुडाळ येथील खासगी रुग्णालयात भरमसाट पैसे मोजून वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. या रुग्णालयात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय तसेच अन्य कर्मचाऱ्यांची बहुतांशी पदे अनेक वर्षे रिक्त आहेत. ही पदे न भरल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाच्या या सर्व समस्यांवर येत्या पंधरा दिवसांत उपाययोजना न केल्यास १० आॅगस्ट रोजी उपोषणास बसण्याचा इशारा शिरोडा युवक काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे. निवेदनाची प्रत जिल्हा परिषद आरोग्य सभापती, शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, वेंगुर्ले तहसीलदार, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिली आहे. (प्रतिनिधी)शवागर नसल्याने गैरसोयया उपजिल्हा रुग्णालयात शवागरसुद्धा उपलब्ध नसून एखाद्या व्यक्तीचा मृतदेह ठेवण्यासाठीची सोय नसल्याने मृतांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रात्री-अपरात्री दाखल झालेल्या अत्यवस्थ रुग्णांना तातडीचे उपचार मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागते. यामध्ये बराच वेळ वाया जाऊन रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होतो.