Anganewadi Jatra 2026: ‘आंगणेवाडी’ सजली; बाजारपेठ फुलली, देवीच्या दर्शनासाठी यंदा खास नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 17:05 IST2026-02-04T17:05:05+5:302026-02-04T17:05:25+5:30

भक्तांच्या श्रद्धेचा महाकुंभ : प्रशासकीय यंत्रणा सज्ज आणि चाकरमान्यांची पावले कोकणाकडे...

Preparations for the annual fair of Shri Devi Bharadi Mata in Anganewadi are in their final stages Special arrangements have been made for devotees visiting to see the goddess this year | Anganewadi Jatra 2026: ‘आंगणेवाडी’ सजली; बाजारपेठ फुलली, देवीच्या दर्शनासाठी यंदा खास नियोजन

संग्रहित छाया

मालवण : अवघ्या महाराष्ट्राचे आणि जगभरातील कोकणी माणसाचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव येत्या ९ आणि १० फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. या उत्सवासाठी अवघी आंगणेवाडीनगरी नटली असून तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी देवस्थान कमिटी, ग्रामस्थ आणि जिल्हा प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराला विद्युत रोषणाईने झळाळी देण्यात आली असून, भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. ‘पावशी’ (देवीचा कौल) मिळाल्यापासून सुरू झालेली ही तयारी आता पूर्णत्वास आली आहे.

वाचा : आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रेत ‘प्लास्टिक’ला नो-एन्ट्री; नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई

यात्रेचे खास आकर्षण आणि नियोजन

भाविकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागू नये म्हणून 'झिग-झॅग' पद्धतीने लोखंडी रेलिंगचे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. उन्हापासून बचावासाठी रांगेवर शेड उभारण्यात आली आहे. गाड्यांच्या पार्किंगसाठी सुमारे ५० एकर पेक्षा जास्त मोकळी जागा आरक्षित केली आहे. मसुरे आणि मालवण मार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत.

वाचा: आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार, आजपासून आरक्षणास सुरुवात; गाड्यांचे वेळापत्रक..जाणून घ्या​​​​​​​

राजकीय धुरिणांची मांदियाळी

आंगणेवाडीची जत्रा म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नसून ते राजकीय शक्तिप्रदर्शनाचे केंद्रही बनले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेते देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावणार आहेत. या व्हीआयपी दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर हेलिपॅड आणि विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

बाजारपेठ फुलली : खाजा आणि काजूंची रेलचेल

मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हजारो स्टॉल्स उभारले आहेत. कोकणी खाजा, लाडू, काजू, मालवणी मसाले आणि खेळण्यांच्या दुकानांनी बाजारपेठ गजबजली आहे. स्थानिक महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांनाही येथे मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

एसटीचा 'लाल डबा' भाविकांच्या सेवेला

कोकण रेल्वे आणि एसटी महामंडळाने यात्रेसाठी कंबर कसली आहे. मुंबईतील परळ, कुर्ला आणि बोरीवली येथून खास गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसेच कुडाळ, मालवण आणि कणकवली आगारातून दर १५ मिनिटांनी आंगणेवाडीसाठी शटल सेवा उपलब्ध असेल.

"देवी भराडी मातेचा हा जत्रोत्सव सर्व भाविकांसाठी सुखाचा आणि मंगलमयी ठरावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. - अध्यक्ष, आंगणेवाडी जत्रोत्सव समिती

Web Title : आंगणेवाडी जत्रा 2026: मंदिर तैयार, बाजार गुलजार, विशेष दर्शन योजना

Web Summary : कोंकणी समुदाय का प्रमुख त्योहार, आंगणेवाडी जत्रा 9-10 फरवरी को। मंदिर जगमगा रहा है, सुगम दर्शन के लिए विशेष व्यवस्था है। पार्किंग, बैरिकेड्स और परिवहन सुव्यवस्थित हैं। राजनेता शामिल होंगे, और बाजार स्थानीय उत्पादों से भरा है।

Web Title : Anganewadi Jatra 2026: Temple Ready, Market Thriving, Special Darshan Plans

Web Summary : Anganewadi Jatra, a major Konkani festival, is set for February 9-10. The temple is illuminated, and special arrangements are in place for smooth darshan. Parking, barricades, and transportation are organized. Political figures will attend, and the market is full of local goods.