शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय भूकंपाची चाहुल

By admin | Updated: December 29, 2014 23:42 IST

दोडामार्ग तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर. पक्षातील अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

वैभव साळकर - दोडामार्ग --लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही पक्षाचा झालेला दारूण पराभव, जिल्ह्यातील नेते मंडळींचे दोडामार्ग तालुक्याकडे झालेले दुर्लक्ष आणि गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेले पक्षाचे तालुकाध्यक्षपद आदी विविध कारणांमुळे दोडामार्ग तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. पक्षातील अनेक आजी- माजी पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे भविष्यात लवकरच दोडामार्ग तालुक्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता तालुक्याच्या राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या दोन्ही निवडणुकांमध्ये काँगे्रसला तालुक्यात सपाटून मार खावा लागला. त्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची मरगळ संचारली. अशा परिस्थितीत तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. तो पक्षश्रेष्ठींनी मंजूर केला. परंतु त्यानंतर रिक्त असलेले तालुकाध्यक्षपद पुन्हा भरण्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी जो उत्साह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये होता, तो अचानक ओसरला. निवडणुकीत पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर जिल्ह्यातील नेतेमंडळी त्यावर चिंतन करून पुन्हा एकदा पक्षसंघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करतील, अशी भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांची होती. मात्र, ती फोल ठरली. जिल्ह्यातील नेते मंडळींनी आणि पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीनंतर तालुक्यात येऊन एकही बैठक घेतली नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्ते चलबिचल झाले असून पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. विरोधात राहण्यापेक्षा सत्तेत राहणे चांगले, या विचाराने अनेक आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही या आजी-माजी पदाधिकाऱ्यांना फोडण्यात यश आले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लवकरच दोडामार्ग तालुक्यात आणखी एक राजकीय भूकंप पहावयास मिळणार आहे. कसई-दोडामार्गमध्ये कमळ फुलणार?तालुक्यात महत्त्वाची असलेल्या तालुका ठिकाणच्या कसई दोडामार्ग ग्रामपंचायतीवर भाजपचे पदाधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत. तालुक्याच्या ठिकाणची ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यातून हिसकावून घेत काँग्रेसला ‘जोर का धक्का’ देण्याच्या तयारीत भाजपची नेतेमंडळी असल्याचे बोलले जात आहे. त्यात काहीअंशी ते यशस्वी देखील झाले असून काही सदस्य भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे कसई-दोडामार्ग ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ फुलणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.