Sindhudurg: वैभववाडीत पोलिसाने राहत्या घरी संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 17:07 IST2025-05-03T17:06:32+5:302025-05-03T17:07:32+5:30
वैभववाडी : वैभववाडी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई अनिल गोविंद शेटे (४०, मूळ गाव कोडोली ता.पन्हाळा, जि कोल्हापूर) यांनी शहरातील ...

Sindhudurg: वैभववाडीत पोलिसाने राहत्या घरी संपवले जीवन
वैभववाडी : वैभववाडीपोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई अनिल गोविंद शेटे (४०, मूळ गाव कोडोली ता.पन्हाळा, जि कोल्हापूर) यांनी शहरातील राहत्या घरी ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अनिल शेटे हे गेल्या काही वर्षांपासून वैभववाडी पोलिस ठाणे येथे सेवा बजावत होते. मध्यंतरी विजयदुर्ग पोलिस ठाण्यात बदली झाली होती. त्यानंतर, ते पुन्हा वैभववाडी स्थानकात बदलून आले होते. शहरातील एका गृहसंकुलात ते कुटुंबासह राहत होते. मात्र, त्यांची गेल्या काही दिवसांपासून मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यांच्यावर मानसिक उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच ते उपचारासाठी कोल्हापूरला जाऊन आले होते.
गुरुवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांची पत्नी स्वयंपाक घरात जेवण बनवत होती. त्यावेळी अनिल हे बेडरूममध्ये होते. बराच वेळ ते खोलीमधून बाहेर आले नाहीत. त्यामुळे पत्नीने त्याना हाक मारली, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पत्नीने खिडकीतून डोकावून पाहिले, तेव्हा पती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.
पत्नीने आरडाओरड केल्यानंतर शेजारच्यांनी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिल्यानंतर, पोलिसांनी तत्काळ धाव घेत दरवाजा तोडून त्यांना खाली उतरविले. त्यानंतर, तत्काळ वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, वडील, आई असा परिवार आहे.