Police seize 3,000 liquor at Banda, Oros police action | CoronaVirus Lockdown :बांदा येथे ७५ हजारांची दारू जप्त, ओरोस पोलिसांची कारवाई

दारू वाहतुकीसाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली.

ठळक मुद्देबांदा येथे ७५ हजारांची दारू जप्त, ओरोस पोलिसांची कारवाई कारसह पावणे चार लाखांचा मुद्देमाल ताब्यात

बांदा : बांदा-डिंगणे मार्गावर सटमटवाडीनजीक कारमधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग ओरोसच्या पथकाने कारवाई केली. यामध्ये एकूण ३ लाख ७५ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई रविवारी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. देशात लॉकडाऊन सुरू असताना सर्वत्र संचारबंदी व राज्याच्या सीमा सील आहेत. असे असूनही दारुमाफियांची गुप्त मार्गाने गोवा बनावटीच्या बेकायदा दारूची वाहतूक सुरू असल्याचे सिध्द झाले आहे. बेकायदा दारू वाहतुकीसाठी वेगवेगळे मार्ग व विविध युक्त्या वापरल्या जात आहेत.

बांदा-डिंगणे मार्गावर सटमटवाडीनजीक कारमधून होणाºया बेकायदा दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग ओरोस पथकाने कारवाई केली. या कारवाईत ७५ हजार ६०० रुपयांची दारू जप्त केली. या दारू वाहतुकीसाठी वापरलेली ३ लाख रुपयांची कार (एम.एच. ०७, एजी ३५२३) ताब्यात घेण्यात आली.

सर्वत्र संचारबंदी व राज्याच्या सीमा सील केलेल्या असतानाही बेकायदा दारू वाहतुक केल्याप्रकरणी दिनेश रामचंद्र मयेकर (५१, रा. पिंगुळी कुडाळ) याच्यावर कारवाई करण्यात आली. याबाबतची तक्रार एलसीबीचे कर्मचारी जयेश वासुदेव सरमळकर (२८) यांनी बांदा पोलिसांत दिली आहे. बांदा सीमा सील असताना व सर्वत्र पोलीस बंदोबस्त असतानाही होणाºया बेकायदा धाडसी दारू वाहतुकीबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

Web Title: Police seize 3,000 liquor at Banda, Oros police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.