शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

कार्यरत पोलिसांनाच पर्यटन पोलिसांचा दर्जा, पोलीस महानिरिक्षक नवल बजाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 21:17 IST

भविष्यात सिंधुदुर्गचे पर्यटन अधिक वाढणार आहे, हे लक्षात घेऊन सध्या पोलीस दलात असलेल्या काहि पोलीस कर्मचाºयांना तसेच अधिका-यांना पर्यटन पोलीस म्हणून प्रशिक्षीत करून दर्जा देण्यात येणार आहे. तशी प्रकिया ही सुरू झाली आहे.

 सावंतवाडी - भविष्यात सिंधुदुर्गचे पर्यटन अधिक वाढणार आहे, हे लक्षात घेऊन सध्या पोलीस दलात असलेल्या काहि पोलीस कर्मचाºयांना तसेच अधिका-यांना पर्यटन पोलीस म्हणून प्रशिक्षीत करून दर्जा देण्यात येणार आहे. तशी प्रकिया ही सुरू झाली आहे. त्यासाठी स्वतंत्र्य पोलीस ठाणे किंवा पर्यटन गाड्या असणार नाहीत, अशी माहिती कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांनी दिली. ते सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी  आंबोलीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याचेही जाहीर केले.कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक नवल बजाज हे गुरूवारी सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांनी येथील पोलिसांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस, सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे आदी उपस्थित होते.महानिरीक्षक बजाज म्हणाले, सागरी महामार्गावर सध्या तरी कोणतेही स्वतंत्र पोलीस ठाणे करण्याचा प्रस्ताव आमच्यापर्यंत आला नाही. मात्र मध्यंतरी आंबोलीत घडलेल्या काही घटनांना बघता येणाºया पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आंबोलीत स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव जिल्ह्यातून शासनाला पाठवण्यात आला आहे. या एकमेव पोलीस ठाण्याचा प्रस्ताव असून, सध्या तरी सागरी महामार्गावर कोणतेही पोलीस ठाणे नसल्याचा  खुलासा बजाज यांनी केला.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन भविष्यात वाढणार आहे. त्यामुळे येथे पर्यटन पोलीस असावेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या काही पोलीस अधिका-यांना तसेच कर्मचा-यांना पर्यटन पोलिसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने जिल्ह्यात येणाºया पर्यटकांशी त्या पोलिसांनी कसे बोलावे तसेच त्यांची मदत कशी करावी यांचे प्रशिक्षण प्रामुख्याने असणार आहे. यासाठी मुंबईच्या धर्तीवर कोणत्याही प्रकारे स्वतंत्र गाडी किंवा स्वतंत्र पर्यटन पोलीस ठाणे असे असणार नाही, असे बजाज यांनी स्पष्ट केले.कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक गोवा व महाराष्ट्र या तीन्ही सीमावर्थी जिल्ह्यातील पोलिसांची बॉर्डर परिषद झाली आहे. यात गुन्हेगारीबाबत काही मुद्दे चर्चेत आले आहेत. तसेच कर्नाटक निवडणुकीवेळी कोल्हापूर, सिंधुदुर्ग पोलिसांनी कशी मदत करावी याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच तपासणी नाके कुठे असावेत याचीही माहिती देण्यात आली असल्याचे बजाज यांनी सांगितले.सिंधुदुर्गात येणाºया पर्यटकांच्या गाड्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी तपासल्या जातात. यात पोलिसच नाही तर इतर विभागाचे अधिकारी या गाड्या तपासतात. मात्र यापुढे आम्ही यात आणखी पारदर्शकता आणू कारण ज्या प्रकारे गोव्यात पर्यटक येतात तसेच पर्यटक भविष्यात जिल्ह्यात येणार आहेत. त्यामुळे येणाºया पर्यटकांना अधिक सुरक्षित वाटावे तसेच त्यांना पोलिसांकडून कोणत्या अपेक्षा आहेत, याची माहिती घेऊन आम्ही तसे काम करू, असे यावेळी बजाज यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस