शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

बांदा येथे पोलिसांचा सत्कार

By admin | Updated: September 15, 2014 23:26 IST

व्यापारी संघाचे आयोजन : उत्तम वाहतूक नियोजन, सुरक्षा

बांदा : बांदा बाजारपेठेतील प्रतिबंधित भागात विसर्जन मिरवणुकांदरम्यान फटाके बंदीची कडक अंमलबजावणी केल्याबद्दल तसेच गणेश चतुर्थी कालावधीत उत्तम वाहतूक नियोजन व सुरक्षा व्यवस्था राखल्याबद्दल बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुंठे यांचा बांदा व्यापारी संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. बांदा पोलीस ठाणे येथे झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर बांदा व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, निवृत्त गटविकास अधिकारी भास्कर पावसकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे, उपनिरीक्षक सुधाकर आरोलकर, पोलीस कर्मचारी एस. एस. नावडकर, सुधीर कदम आदी उपस्थित होते. बांदा व्यापारी संघाचे सचिव सचिन नाटेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, चतुर्थीपूर्वी नियोजनासाठी दक्षता समितीची बैठक घेऊन गुठे यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांचे गांभीर्य ओळखून कडक अंमलबजावणी केली. भास्कर पावसकर म्हणाले, बाजारपेठेतील फटाके बंदीमुळे गेल्या अनेक वर्षांनंतर आपण विसर्जन मिरवणूक पाहिली. अन्यथा या आधी दोनवेळा मिरवणुकीतील फटाक्यांमुळे आपल्या व शेजारच्या घरात आगीमुळे नुकसान अनुभवले आहे. राकेश केसरकर म्हणाले की, मिरवणुकीतील फटाके बंदीचे चांगले फलित म्हणून यंदा ढोल पताकांवर वाजतगाजत मिरवणुका निघाल्या व यापुढेही आदर्श मिरवणुका निघतील. यावेळी सत्काराला उत्तर देताना जयप्रकाश गुठे म्हणाले, पोलीस हा निधर्मी मनाने कोणतेही वैयक्तिक हेतू न बाळगता जनतेच्या हितासाठी कायद्याची अंमलबजावणी करीत असतो. त्यात जनतेचे सहकार्य मोलाचे ठरते. बांदावासीयांच्या सहकार्यामुळेच हे वाहतूक नियोजन तसेच सुरक्षा तरतुदी शक्य झाल्या. यावेळी दत्तप्रसाद पावसकर यांच्या हस्ते गुठे यांना शाल, श्रीफळ व गणेश मूर्ती प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी सचिन नाटेकर, मंगलदास साळगावकर, भास्कर पावसकर, संदीप प्रभू, राजेंद्र कुबडे, स्वप्निल पावसकर, श्रीकांत कु बडे, सूर्यकांत नार्वेकर, नंदू कल्याणकर, प्रसाद कामत, किशोर साळगावकर, दत्तप्रसाद केसरकर, प्रदीप सावंत, मिलिंद सावंत, विवेक विर्नोडकर, नीलेश नाटेकर, साहिल कल्याणकर, राजू खान, सागर तेली आदींसह अनेक व्यापारी उपस्थित होते. स्वागत संदीप प्रभू, सूत्रसंचालन सचिन नाटेकर, आभार राकेश केसरकर यांनी मानले. (प्रतिनिधी)