त्या सांगाड्याची ओळख पटविण्यात पोलिसांना अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 07:49 PM2021-07-02T19:49:00+5:302021-07-02T19:50:22+5:30

Crimenews Kankavli Sindhudurg : दोन महिन्यांपूर्वी कणकवली तालुक्यातील नरडवे येथे पूर्णतः जळालेल्या अवस्थेत अज्ञात पुरुष जातीचा सांगाडा आढळून आला होता. त्या सांगाड्याची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून अजूनही त्यात यश मिळालेले नाही.

Police failed to identify the skeleton | त्या सांगाड्याची ओळख पटविण्यात पोलिसांना अपयश

त्या सांगाड्याची ओळख पटविण्यात पोलिसांना अपयश

Next
ठळक मुद्देत्या सांगाड्याची ओळख पटविण्यात पोलिसांना अपयश नरडवे येथे जळालेल्या अवस्थेत सापडला होता

कणकवली : दोन महिन्यांपूर्वी कणकवली तालुक्यातील नरडवे येथे पूर्णतः जळालेल्या अवस्थेत अज्ञात पुरुष जातीचा सांगाडा आढळून आला होता. त्या सांगाड्याची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून अजूनही त्यात यश मिळालेले नाही.

नरडवे येथे सुशांत कदम यांच्या शेतजमिनीत तो सांगाडा सापडला होता. मात्र, तो सांगाडा नेमका कोणाचा आहे ? याबाबत अजूनही माहिती समजू शकलेली नाही. तो सांगाडा मिळाल्यानंतर पोलिसांकडून घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तसेच त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुल्ला, पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे हे या घटनेचा तपास करीत आहेत.

दरम्यान, नरडवे परिसरातील एखादी व्यक्ती बेपत्ता झाली आहे का ? याचा शोधही पोलिसांकडून घेण्यात आला. मात्र, त्या मृतदेहाबाबत अजूनही काहीच माहिती समजू शकलेली नाही. तो सांगाडा नेमका कोणाचा आहे ? हे समजण्यासाठी डीएनए चाचणी उपयोगी पडू शकते. त्यामुळे पोलिसांनी कोल्हापूर येथील लॅबमध्ये तो सांगाडा पाठविला आहे. तो अहवाल मिळाल्यानंतर काही तरी तपासाचा धागा मिळू शकेल, असे पोलिसांचे म्हणणे असून सध्या तरी त्या सांगाड्याची ओळख पटलेली नाही.

Web Title: Police failed to identify the skeleton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.