..अखेर सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजला परवानगी, जिल्हावासियांचे स्वप्न साकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 19:02 IST2022-02-03T18:35:00+5:302022-02-03T19:02:23+5:30

केंद्रीय समितीने ज्यावेळी या वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली होती त्यावेळी काही त्रुटी काढल्या होत्या

Permission to Sindhudurg Government Medical College | ..अखेर सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजला परवानगी, जिल्हावासियांचे स्वप्न साकार

..अखेर सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजला परवानगी, जिल्हावासियांचे स्वप्न साकार

कणकवली : गेले काही वर्ष सातत्याने पाठपुरावा करून देखील अडचणींचा डोंगर उभा राहात असलेले सिंधुदुर्ग जिल्हा वासियांचे स्वप्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांच्याकडून ही अधिकृत मंजुरी देण्यात आली असून, गेले काही वर्ष सिंधुदुर्ग जिल्हा वासियांची असलेले स्वप्न अखेर साकार झाले आहे. 

या वैद्यकीयमहाविद्यालयात एमबीबीएसच्या शंभर विद्यार्थ्याच्या बॅच ला शिक्षण घेता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांचा याकरिताचा सातत्यपूर्ण पाठपुरावा या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण ठरला आहे. मध्यंतरी केंद्रीय समितीने ज्यावेळी या वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली होती त्यावेळी या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये काही त्रुटी काढण्यात आल्या होत्या. 

मात्र त्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर केलेल्या तपासणीत हे महाविद्यालय मंजुरीस पात्र ठरले आहे. या मंजुरीचे अधिकृत आदेशही काढण्यात आले आहेत.

Web Title: Permission to Sindhudurg Government Medical College