शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

पावणेदोन लाखांची दारू पकडली, महामार्गावरील ओसरगाव येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 18:02 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगांव नवीन टोलनाका येथे शुक्रवारी पहाटे गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत १ लाख ८0 हजार रुपयांच्या अवैध दारूसह एकूण ५ लाख ८0 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देपावणेदोन लाखांची दारू पकडली, महामार्गावरील ओसरगाव येथील घटना ५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

सिंधुदुर्गनगरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगांव नवीन टोलनाका येथे शुक्रवारी पहाटे गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत १ लाख ८0 हजार रुपयांच्या अवैध दारूसह एकूण ५ लाख ८0 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तर बिगरपरवाना गोवा बनावटीची अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी तेजस दिनेश गिरी (२६ रा. माठेवाडा सावंतवाडी) व आत्माराम लक्ष्मण आरोंदेकर (२७ रा. सातार्डा, सावंतवाडी)या दोघांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर उपायुक्त व सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ओरोस येथील भरारी पथकाचे निरीक्षक एस. के. दळवी, दुय्यम निरीक्षक यू. एस. थोरात, जवान आर. डी. ठाकूर, दीपक वायदंडे, जे. आर. चव्हाण, एच. आर. वस्त, आर. एस. शिंदे यांच्या टीमने कणकवली तालुक्यातील ओसरगांव येथील नवीन टोलनाका येथे सापळा रचला होता.

त्यानुसार शुक्रवार १७ जानेवारी रोजी पहाटे या पथकाने ओसरगांव नवीन टोलनाका येथे महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणारी कार (एम एच ०७ एस ४४५५) तपासणीसाठी थांबवून तपासली असता कारमध्ये १ लाख ८० हजार रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या दारुचे ४६ बॉक्स आणि अवैध दारू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली ४ लाख रुपये किंमतीची कार असा एकूण ५ लाख ८0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दोघांवर गुन्हा दाखलगोवा बनावटीची बिगर परवाना अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी तेजस दिनेश गिरी (२६, रा. माठेवाडा सावंतवाडी) व आत्माराम लक्ष्मण आरोंदेकर (२७ रा. सातार्डा, सावंतवाडी) यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चालक जे. आर. चव्हाण यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदीCrime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग