शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
4
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
5
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
6
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
7
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
8
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
9
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
10
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
11
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
12
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
13
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
14
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
15
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
16
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
17
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
18
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
19
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
20
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

देशव्यापी महामोर्चात सहभागी व्हा : डान्टस

By admin | Updated: July 20, 2015 00:06 IST

सावंतवाडीत माजी सैनिक संघटनेचा मेळावा

सावंतवाडी : आघाडी सरकार सत्तेत असताना माजी सैनिकांनी वन रँक वन पेन्शन योजनेची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन त्यावेळी विरोधात असलेल्या भाजप सरकारने माजी सैनिकांना दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने सरकारला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी २६ जुलै रोजी दिल्ली जंतर मंतर येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली इंडियन एक्स सर्व्हिसेस लिग या माजी सैनिकांच्या संघटनेतर्फे देशव्यापी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष पी. एफ. डान्टस यांनी केले आहे. सावंतवाडी येथे रविवारी इंडियन एक्स सर्व्हिसेस लिग या माजी सैनिक संघटनेच्यावतीने मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात डान्टस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ, दीनानाथ सावंत, शिवाजी परब, दीपक राऊळ आदी उपस्थित होते. यावेळी डान्टस म्हणाले, देशाच्या सीमेवर रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या मागण्यांकडे सरकार गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. वन रँक वन पेन्शन, सातवा वेतन आयोग यासारख्या मागण्यांसाठी माजी सैनिक संघटना शासनाशी गेली अनेक वर्षे झगडत आहे. त्यावेळच्या विरोधी भाजपा सरकारने सत्तेत आल्यानंतर आपण हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले होते. मात्र, भाजप सत्तेत येऊन वर्ष पूर्ण झाले, तरी माजी सैनिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. नवीन सरकारला जाग आणण्यासाठी उपोषणे, आंदोलने व पाच, सहावेळा निवेदनेही देण्यात आली. तरीही शासन दुर्लक्ष करीत आहे. माजी सैनिकांना देण्यात येणारी पेन्शन ५० हून ७० टक्के एवढी मिळाली, तर त्यांच्या कुटुंबियांना ३० टक्के मिळणारी पेन्शन ७० टक्के व्हावी, अशा अनेक प्रश्नांसंदर्भात सरकारला जागे करण्यासाठी महामोर्चाचे आयोजन केल्याची माहिती डान्टस यांनी दिली. (वार्ताहर)