शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Sindhudurg: ..अन्यथा 'त्या' अमेरिकन महिलेप्रकरणी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला द्यावे लागले असते तोंड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 13:22 IST

‘ती’ अमेरिकी महिला दहा वर्षांपासून राहत होती भारतात

सावंतवाडी : सोनुर्ली रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळून आलेल्या अमेरिकन महिलेने स्वतःला साखळदंडाने बांधून घेत बनाव रचल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.दरम्यान ही महिला मूळची अमेरिकन आहे. तरी गेल्या दहा वर्षांपासून भारतीय नागरिकत्व स्वीकारून तामिळनाडूमध्ये ती वास्तव्यास होती. तिचे तेथील आधार कार्ड ही आहे. त्यामुळे आता तिच्याकडे दोन देशांचे नागरिकत्व असल्याचे पुढे येत आहे. योगाच्या निमित्ताने दहा वर्षांपूर्वी भारतात आलेल्या या महिलेला आता पुन्हा मायदेशी परतण्याची ओढ लागली असून, मे महिन्यात तिने तसा अमेरिकन दूतावासात अर्ज ही दिल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. पण, पोलिस या महिलेचा पूर्ण जबाब सांगत नसून, तो तपासाच्या दृष्टीने गृप्त ठेवण्यात आला आहे.

सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात २७ जुलैला अमेरिकन महिला ललिता कायी कुमार एस ही साखळदंड बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. पोलिसांनी या घटनेचा कसून तपास केला. मात्र, अवघ्या दहा दिवसांनंतर हा सर्व बनाव असल्याचे उघड झाले आहे. ही महिला मानसिक रुग्ण असल्याचे पोलिस तपासात पुढे आले होते. पण, पोलिसांनी सर्व तपास गुप्त पद्धतीने सुरू ठेवला. जेव्हा या महिलेने जबाब पोलिसांकडे नोंदविल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.ललिता कायी कुमार एस ही अमेरिकन महिला दहा वर्षांपूर्वी योगाच्या निमित्ताने भारतात आली. तिचे वास्तव्य हे तामिळनाडूमधील एका आश्रमात होते. ती भारतात आली, तरी तिला तिची आई अमेरिकेतून पैसे पाठवत असे तिचे आईशी सतत बोलणे ही होत होते. मात्र, ललिता कायी कुमार एस ही अलीकडच्या काही महिन्यांपासून तिचे थोडेसे अधिकचे मानसिक संतुलन बिघडले होते. तिच्यावर बंगलोर गोवा दिल्ली येथील मनोरुग्णालयात उपचार ही सुरू आहेत.

सतत केरळ-मुंबई प्रवास करायचीललिता कायी कुमार एस ही महिला केरळ-मुंबई हा प्रवास सतत करायची. त्यामुळे तिला रेल्वे कुठे थांबते हे माहीत होते. साधारणतः २३ जुलैच्या दरम्यान ती मडुरा रेल्वे स्थानकात उतरून चालत रोणापाल जंगलात गेली आणि एका झाडाला स्वतःला साखळदंडाने बांधून घेत बनाव रचला.

..तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला तोंड द्यावे लागले असतेया महिलेने स्वतःच साखळदंडाने बांधून घेत बनाव रचल्याचे उघड झाले. मात्र, जर या मागे अन्य कोण असते, तर या प्रश्नावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला अनेक उत्तरे द्यावी लागली असती, पण आता त्या महिलेच्या जबाबाने सत्य उजेडात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तपास पथक अद्याप तामिळनाडूतललिता कायी कुमार एस या महिलेने जरी जबाब दिला असला, तरी या प्रकरणामागे अन्य कोण आहे का? तसेच तिचे लग्न झाले आहे का? तिच्या सोबत अन्य कोण राहत होते. तिचे वास्तव्य कुठे-कुठे होते, या सर्वाची माहिती घेण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांचे तपास पथक तामिळनाडूमध्ये ठाण मांडून आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस