शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्गमध्ये भाजप-शिंदेसेनेत स्वबळावरून जुंपली; मगच बाता माराव्यात, संजू परब यांना सुधीर दळवींचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:38 IST

दोडामार्ग : येणारी प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या संजू परब यांनी शिंदेंसेनेत प्रवेश केल्यावर आपल्यासोबत किती नगरसेवक आणले. ...

दोडामार्ग : येणारी प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या संजू परब यांनी शिंदेंसेनेत प्रवेश केल्यावर आपल्यासोबत किती नगरसेवक आणले.  परमे आणि कोलझर  सोसायटी निवडणुकीत सत्ता आणलेल्या संचालकात स्वतःच्या पक्षाचे  किती संचालक आहेत? याचे प्रथम आत्मपरीक्षण करावे आणि मगच स्वबळाच्या बाता माराव्यात, असे  प्रत्युत्तर शिंदेंसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांना भाजपचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी बुधवारी दिले. शिवाय सोसायटीच्या निवडणुकीत उद्धवसेनेच्या कुबड्या घेण्याची वेळ परब यांच्यावर आली, त्यातच त्यांचा पराभव आहे, अशी जहरी टीकाही केली.परब यांनी काही दिवसांपूर्वी स्वबळावर निवडणूक लढविण्याचे वक्तव्य केले होते. त्याला भाजपकडून पत्रकार परिषदेतून उत्तर देण्यात आले. यावेळी  कसई दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, आनंद तळणकर, संजय सातार्डेकर, दीपक गवस, देवेंद्र शेटकर, पराशर सावंत, भैया पांगम आदी उपस्थित होते.दळवी पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघात आमदार दीपक केसरकर यांचे काम भाजपाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते.  त्यामुळेच ते निवडून आले. याची जाणीव शिंदेसेनेच्या प्रत्येकाने ठेवावी. ज्यावेळी विधानसभा निवडणूक लागली होती त्यावेळी याच शिंदेसेनेच्या पक्षातील बरेचसे पदाधिकारी व कार्यकर्ते विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे काम करत होते. मात्र, भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाचा आदेश पाळून  केसरकरांचे काम केले.निवडणुका संपलेल्या नाहीत : चेतन चव्हाणदोन सोसायट्यांच्या निवडणुका जिंकून संजू परब यांना स्वबळावर निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पडत असेल तर भविष्यात निवडणुका संपलेल्या नाहीत. त्यांना आगामी निवडणुकीत भाजपाची ताकद दिसेल, असा गर्भित इशारा नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिला.शिंदेसेनेने उद्धवसेनेच्या घेतल्या कुबड्या : दळवीआताच झालेल्या विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत शिंदेंसेनेला महायुतीचा विरोधक असलेल्या उध्दवसेनेच्या कुबड्या घ्याव्या लागल्या, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. यातच त्यांचा खरा पराभव आहे, अशी टीका सुधीर दळवी यांनी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण