शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
2
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
3
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
4
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
5
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
6
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन
7
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
8
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
9
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
10
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
11
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
12
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
13
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
14
कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook
15
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
16
जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
17
IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
19
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
20
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...

..त्यानंतरच शक्तिपीठ महामार्गाच्या घोषणा करा; वैभव नाईक यांचा नारायण राणेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:51 IST

जनतेला त्यांनी धमक्या देऊ नयेत

कणकवली : शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना फटके देणार, अशी धमकी देणाऱ्या नारायण राणे यांनी आधी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करावा. तसेच बंद चिपी विमानतळ सुरू करावे. त्यानंतरच शक्तिपीठ महामार्गाच्या घोषणा कराव्यात, असा टोला उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.याबाबतच्या प्रसिद्धिपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, नारायण राणे हे गेली साडेतीन वर्षे केंद्रीय मंत्री होते. आता लोकसभेचे खासदार आहेत. त्यांना मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करता आले नाही. आम्ही सुरू केलेले चिपी विमानतळ त्यांच्या कार्यकाळात बंद पडले. ते त्यांना सुरू करता आलेले नाही. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना फटके देणार अशा धमक्या ते देत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नेहमीच विकासाला योगदान दिले आहे. मुंबई-गोवा महामार्गाला शेतकऱ्यांनी स्वतःहून जमिनी दिल्या. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्ग पूर्ण झाला. मात्र, इतर जिल्ह्यात हा महामार्ग पूर्ण होऊ शकला नाही.

केंद्रीय मंत्री असताना नारायण राणेंनी हा महामार्ग का पूर्ण करून घेतला नाही. चिपी विमानतळ सुरू करण्याच्या केवळ राणे घोषणा करीत आहेत. आता शक्तिपीठ महामार्गाच्या कामात ठेकेदाराकडून आर्थिक देवाण घेवाणीसाठी राणेंना शक्तिपीठ महामार्ग हवा असेल तर शेतकऱ्यांच्या विरोधाला आमचा पाठिंबा असेल.जनतेला त्यांनी धमक्या देऊ नयेतशेतकऱ्यांना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला त्यांनी धमक्या देऊ नयेत. त्या धमक्यांना सिंधुदुर्गची जनता भीक घालणार नाही. आम्ही विकासाच्या बाजूने आहोत. मात्र, राणेंना मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करता आला नाही. चिपी विमानतळ सुरू करता आले नाही. लोकसभा निवडणुकीत आश्वासन दिलेल्या सीवर्ल्ड प्रकल्पाचे काय झाले? त्यामुळे विकासावर बोलण्याचा राणेंना कुठलाही अधिकार नाही, असेही वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गNarayan Raneनारायण राणे Vaibhav Naikवैभव नाईक