Sindhudurg: घराला लागलेल्या आगीत होरपळून एकाचा मृत्यू 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 25, 2024 11:51 IST2024-12-25T11:49:12+5:302024-12-25T11:51:53+5:30

संदीप बोडवे मालवण : तालुक्यातील चौके स्थळकरवाडीतील एका घरातील पडवीला आग लागून दीपक सखाराम परब (बावकर) (वय-५५) यांचा आगीत ...

One person died in a house fire at Chowke Sthalkarwadi in Malvan taluka Sindhudurg | Sindhudurg: घराला लागलेल्या आगीत होरपळून एकाचा मृत्यू 

Sindhudurg: घराला लागलेल्या आगीत होरपळून एकाचा मृत्यू 

संदीप बोडवे

मालवण : तालुक्यातील चौके स्थळकरवाडीतील एका घरातील पडवीला आग लागून दीपक सखाराम परब (बावकर) (वय-५५) यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. काल, मंगळवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

चौके स्थळकरवाडीत राहणारे दीपक परब (बावकर) हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. ते पत्नी मुलांपासून बाजूला घराच्या मागील पडवीत अलिप्त राहत होते. काल, मंगळवारी रात्री ते घरी असताना अचानक पडवीला आग लागून घराने पेट घेतला. यावेळी शेजारील नागरिकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आतमधून कडी असल्यामुळे आणि आगीने मोठा पेट घेतल्याने दरवाजा उघडता आला नाही. 

याबाबत चौके पोलिस पाटील यांनी मालवण पोलिसांना घटनेची माहिती दिली. आग आटोक्यात येत नसल्याने अखेर मालवण नगरपालिका अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले. सुमारे तासभरानंतर आग आटोक्यात आली. यानंतर पडवीत पूर्णपणे जळालेल्या अवस्थेतील दीपक यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. पुढील तपास मालवण पोलिस करीत आहेत.

Web Title: One person died in a house fire at Chowke Sthalkarwadi in Malvan taluka Sindhudurg