रेल्वेतून तोल जाऊन पडल्याने एकाचा जागीच मृत्यू, सिंधुदुर्गमधील साकेडी येथील घटना
By सुधीर राणे | Updated: March 16, 2023 15:23 IST2023-03-16T15:22:29+5:302023-03-16T15:23:14+5:30
कणकवली : बेंगलोर रेल्वेने मुंबईहून कणकवलीच्या दिशेने येत असताना रेल्वेतून तोल जाऊन पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. संदीप हरी ...

रेल्वेतून तोल जाऊन पडल्याने एकाचा जागीच मृत्यू, सिंधुदुर्गमधील साकेडी येथील घटना
कणकवली : बेंगलोर रेल्वेने मुंबईहून कणकवलीच्या दिशेने येत असताना रेल्वेतून तोल जाऊन पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. संदीप हरी पारकर (वय-५८, चिंदर ,भटवाडी, मालवण) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज, गुरुवारी (दि.१६) सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावर कणकवली तालुक्यात साकेडी, बौद्धवाडी दरम्यान घडली.
संदीप हे रेल्वेतून खाली पडल्याचे रेल्वेतील प्रवाशांनी पाहिले. त्यानंतर याबाबत प्रवाशांनी कणकवली रेल्वे स्टेशनला माहिती दिली. कणकवली येथील रेल्वे सुरक्षा बल व कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मात्र संदीप पारकर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले.
त्यानंतर त्यांचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे, पोलीस हवालदार मिलिंद देसाई, माने, कोकण रेल्वे सुरक्षाबलाचे राधेश्याम, प्रदीपकुमार आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.