Sindhudurg: दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 9, 2024 19:18 IST2024-03-09T19:16:36+5:302024-03-09T19:18:09+5:30
सिंधुदुर्ग : देवगड शहरानजीक जामसंडे पेट्रोल पंपानजिक दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. धडकेत गंभीर दुखापत झाल्याने ६५ वर्षीय अनंत ...

Sindhudurg: दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू
सिंधुदुर्ग : देवगड शहरानजीक जामसंडे पेट्रोल पंपानजिक दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. धडकेत गंभीर दुखापत झाल्याने ६५ वर्षीय अनंत श्रीधर तेली यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.८) हा अपघात झाला.
दुचाकीस्वार दर्शन प्रदीप भोवर (रा. जामसंडे विष्णुनगर) यांच्या दुचाकीची पादचारी अनंत तेली यांना धडक झाली. या धडकेत अनंत यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद देवगड पोलिस ठाण्याला करण्यात आली आहे. दरम्यान, कुणकेश्वर यात्रोत्सवानिमित्त देवगडकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्यांची संख्या मोठी आहे. तसेच या मार्गावर रहदारी वाढल्याने अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.