शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांसाठी आता उपद्रव शुल्क, शासकीय जंगलात अपप्रवेश केल्यास कायदेशीर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 11:43 AM

सिंधुदुर्गनगरी : आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून यापुढे उपद्रव शुल्क निधी संकलित करण्यात येणार आहे. धबधब्याच्या ठिकाणी व ...

सिंधुदुर्गनगरी : आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून यापुढे उपद्रव शुल्क निधी संकलित करण्यात येणार आहे. धबधब्याच्या ठिकाणी व घाट परिसरात, तसेच वनहद्दीत कचरा करू नये, वनास व पर्यावरणास बाधा पोहोचवणारे कोणतेही कृत्य करू नये, वन व वन्यजीव कायद्यांचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शासकीय जंगलात अपप्रवेश केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी दिला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून, सावंतवाडी तालुक्यातील पारपोली वनक्षेत्रात आंबोली धबधबा येतो. याठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. पर्यटकांकडून धबधब्याच्या ठिकाणी व घाट परिसरात प्लास्टिक कचरा, बॉटल, खाद्यपदार्थांचे रॅपर, तसेच इतर घनकचरा केला जातो. त्यामुळे पर्यावरणास बाधा निर्माण होऊन वनातील जैवसाखळीवर त्याचा दुष्परिणाम होतो, तसेच पर्यटकांकडून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे वन्यजीवांच्या अधिवासास बाधा निर्माण होते, असेही त्यांनी सांगितले.

१४ वर्षांवरील व्यक्ती २०, पाच वर्षांवरील मुलास १०मुख्य धबधबा पारपोली वनहद्दीत असल्याने आंबोली धबधब्यास भेट देणाऱ्या पर्यटकांकडून १४ वर्षांवरील व्यक्तीस २० रुपये व ५ वर्षांवरील मुलास १० रुपये, असे शुल्क पारपोली संयुक्त वनव्यवस्थापन समितीमार्फत आकारण्यात येईल. जमा होणाऱ्या रकमेचा वापर धबधबा व्यवस्थापनासाठी तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या मजुरांचे मानधन व इतर खर्चासाठी करण्यात येईल. शिल्लक राहणारी रक्कम पारपोली, आंबोली व चौकुळ येथील वनविकासासाठी वापरण्यात येईल.

दंड ठोठाविण्याच इशारामुख्य धबधब्यावरील पर्यटन उपद्रव शुल्क वसूल करताना, तसेच आनुषंगिक बाबींमध्ये कोणत्याही व्यक्तीने अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणला म्हणून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल, तसेच प्रचलित नियमानुसार आर्थिक दंड आकारला जाणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनtourismपर्यटन