शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे राणेंच्या सभा काळोखामध्येच

By admin | Updated: October 10, 2014 23:03 IST

राजेंद्र म्हापसेकरांची भाजपाच्या मेळाव्यात टीका

कसई दोडामार्ग : जिल्ह्यात नारायण राणे यांचे नेतृत्व असताना त्यांचे सदस्य फोडणे कोणाची हिम्मत होत नसे. मात्र, भाजपाने ते करुन दाखविले. तालुक्यात काँग्रे्रसचे दोन पंचायत समिती सदस्य फोडून भाजपात आणल्यामुळे नारायण राणेंना काळोखात सभा घेणे भाग पडले आणि यापुढेही तसेच होणार आहे. भाजपाच्या जीवावर निवडून आलेले आम्हालाच भाषा शिकवायला लागले आहेत, असे मत भाजपाचे उपाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी व्यक्त केले. दोडामार्ग येथील सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. युती तुटल्याने भाजपावर शिवसेनेकडून होत असलेल्या टीकेबाबत म्हापसेकर म्हणाले, आजच्या शिवसैनिकांचे खरे प्रेम कुणावरही नाही. आज एका पक्षात, उद्या दुसऱ्या पक्षात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका म्हापसेकर यांनी केली. खरा शिवसैनिक शिवसेनेला कधी मदत करणार नाही. तो भाजपालाच मदत करेल. माजी आमदार केसरकरांना आता शिवसेना जवळची वाटते. काही दिवसांपूर्वी हेच केसरकर शिवसेनेला दहशतवादी म्हणायचे. तसेच केसरकरांना भाजपातही येण्यासाठी निमंत्रण दिले होते, असे केसरकर सांगतात. मात्र, ज्यापक्षाने त्यांना मोठे केले, त्याच पक्षाचा त्यांनी घात केला, असे म्हापसेकर यांनी सांगितले. काँग्रेसच्या दोन सदस्यांना भाजपाने सभापती व उपसभापती पदे दिली. नारायण राणे यांच्यावर प्रथमच नामुष्की ओढवली आहे. जिल्हा परिषद विषय सभापती व उपसभापती निवडणूक प्रथमच राणेंना रद्द करावी लागली. इतकेच नव्हे, तर दोडामार्गात रात्रीचा प्रचार करावा लागला आणि दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सभा घेण्याची वेळ आली, अशी टीका नारायण राणे यांच्यावर केली. तर केसरकरांनी जातीचे राजकारण थांबवावे, अन्यथा तुमचे धंदे आम्हाला उघड करावे लागतील, अशा शब्दात म्हापसेकरांनी समज दिली आहे. (वार्ताहर)