शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार नाही; तर विद्यार्थ्यांना उत्तरकार्याची जेवणावळ

By admin | Updated: January 7, 2015 23:59 IST

गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पाठराखण?

खेड : शालेय पोषण आहाराबाबत विविध तक्रारी सुरु असतानाच खेडमध्ये एक विचित्रच प्रकार उघडकीस आला आहे. खेड तालुक्यातील मुरडे ब्राह्मणवाडी येथील केंद्रीय शाळेतील विद्यार्थ्यांना ५ जानेवारी रोजी पोषण आहार न देता चक्क उत्तरकार्याचे जेवण जेवायला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खेड तालुक्यात पोषण आहाराबाबत वाढत्या तक्रारी असताना आता मुरडे येथे नवीनच प्रकार उघडकीस आला आहे. मुरडे येथे दररोज पोषण आहार दिला जातो. मात्र, दि. ५ जानेवारी रोजी शालेय पोषण आहार शिजवण्यात आला नाही. हा आहार शिजवणाऱ्या महिलेला आज आहार शिजवायचा नाही, असे सांगून तिला आहार शिजवू दिला नाही. ५ जानेवारीस शाळेलगतच असलेल्या शामसुंदर दळवी यांच्या आईच्या उत्तरकार्याची ती जेवणावळ होती. विशेष म्हणजे या पोषण आहार समितीचे अध्यक्ष सरपंच दिगंबर दळवी आहेत. त्यांना या जेवणावळीची कोणतीही माहिती या शिक्षकांनी दिली नव्हती़ या जेवणावळीचे निमंत्रण मुलांना दिल्याने पोषण आहार शिजवला नसल्याची माहिती येथील पदवीधारक शिक्षक जगताप गुरूजी यांनी आपल्याला फोनवरून दिल्याचे सरपंच दिगंबर दळवी यांनी सांगितले. मुळातच ही बाब अतिशय गंभीर आहे. केंद्रप्रमुख दराणे आणि मुख्याध्यापक मोहिते यांनी मुलांना अशा प्रकारचे जेवण दिल्याने ते सरकारच्या कोणत्या नियमांमध्ये बसते? असा सवाल उपस्थित केला आहे. सरकारने दिलेला शालेय पोषण आहार शाळेत उपलब्ध असताना एखाद्या उत्तरकार्याचे जेवण विद्यार्थ्यांना देणे हे कितपत योग्य आहे, तसेच शासनाच्या पोषण आहारासाठी असलेल्या धोरणाचे पूर्ण उल्लंघन केले आहे़ विशेष म्हणजे शाळेतील शिक्षकांच्या काही तक्रारींबाबत आपल्याकडे माहिती आली असतानाच आता हे शिक्षकांचे नवीन प्रकरण उजेडात आल्याने सरपंच दिगंबर दळवी यांनी चिंता व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पाठराखण?सोमवारी गटशिक्षणाधिकारी मंगला वाव्हळ यांच्या समवेत झालेल्या बैठकीतदेखील वाव्हळ यांनी कारवाईचे आश्वासन न देता या दोन्ही शिक्षकांना पाठीशी घालत असल्याचा दळवी यांनी आरोप केला आहे़. खेड तालुक्यात शालेय पोषण आहार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पोषण आहाराबाबत अनेक तक्रारी येत असताना त्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने दळवी यांनी सांगितले.केंद्रप्रमुख आणि शिक्षकांनी गावातीलच एका उत्तरकार्याची जेवणावळ घडवल्याने संताप व्यक्त होत आहे. सरपंच दिगंबर दळवी यांनी तर या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे़ तसे निवेदन दळवी यांनी गटशिक्षणाधिकारी मंगल वाव्हळ यांना दिले आहे. याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी वाव्हळ यांनी थेट कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.