शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी प्रकल्प थांबविण्याची ताकद कुणात नाही, आमदार नितेश राणेंनी व्यक्त केलं स्पष्ट मत

By सुधीर राणे | Updated: April 27, 2023 13:09 IST

'प्रकल्प उभा राहिला की हेच ठेका घेणार'

कणकवली: बारसूमध्ये सध्या माती परीक्षणाचे काम सुरू आहे. तिथे रिफायनरीचे कामही सुरू झालेले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांसहीत आम्ही सरकारचे जेवढे प्रतिनिधी आहोत, या सर्वांची भूमिका स्पष्ट आहे. लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प होणार नाही. बारसू असेल वा नाणार तो भाग वगळून देवगड व राजापूरचा भाग असेल तिथे  हा प्रकल्प  होणार आहे. त्याठिकाणी  ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार असून त्याला थांबविण्याची कुणात ताकद नाही, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.रिफायनरी प्रकल्पाविषयी भूमीका स्पष्ट करण्यासाठी कणकवली येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्राचा हा मूळ प्रकल्प असल्याने त्याबाबत केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे पंतप्रधान  व संबंधीत मंत्र्यांनाही भेटलेले आहेत. त्यावेळी माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार त्यांच्या सोबत होते. त्यामुळे सर्वांची सहमती घेऊनच, सर्वांना विश्वासात घेऊनच केंद्र व राज्य सरकार हा प्रकल्प राबविणार आहे. त्यामुळे कुणालाही आंदोलनाची गरज भासणार नाही. विरोधाची गरज भासणार नाही.आता  खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक हे विरोध करताना दिसत आहेत, ते स्वतःची किंमत वाढवत आहेत. खासदार राऊत आता उद्योगमंत्री उदय सामंतांवर टीका करतात. ते खासदार राऊत दिवसातून कितीवेळा उदय सामंत व किरण सामंत यांना फोन करतात व काय, काय बोलतात? याचा एकदा मी तपशिल जाहीर करणार आहे. मी खोटे बोलत असेन तर खासदार राऊत यांनी फोनचा 'सीडीआर रिपोर्ट' जाहीर करावा. एका बाजूला तुम्ही प्रकल्पाला विरोध करता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही उदय सामंत व त्यांच्या लोकांकडून स्वतःसाठी खर्च मागता. हे असे कसे होणार ?  विनायक राऊत व वैभव नाईक यांनी बारसू सारखीच भेट चिपी विमानतळ, सी-वर्ल्ड प्रकल्पाच्या विरोधावेळी दिली होती. आता विमानतळ सुरू झाले. त्यावेळी उद्घाटन करण्यासाठी कोण पुढे आले? जे विरोध करीत होते तेच आले. विमानतळ सुरू झाल्यानंतर लेबर व कॅटरिंग ठेका कोण मागत होते?  ती विनायक राऊत यांचीच कंपनी होती. ब्लास्टिंग ठेका वैभव नाईक यांच्या कंपनीने घेतला. त्यामुळे त्यांचे दौरे हे लोकांसाठी नाहीत. प्रकल्प उभा राहिला की हेच ठेका घेणार आहेत. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. हेच विरोध करतात व काम झाले की हेच कामे घेतात, हे कसे काय? टोलबाबतही तीच स्थिती आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊनच हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प केंद्र व राज्य सरकार पूर्ण करणारच, असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पNitesh Raneनीतेश राणे