शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळे मिटेल"; मुजोर अग्रवालची पोलिस आयुक्तालयातच पत्रकारांना धमकी
2
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
3
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
4
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
5
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
6
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
7
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
8
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
9
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका
10
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
11
पाकची ताकद किती? हे पाहण्यासाठी लाहोरला गेलो; मणिशंकर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे प्रत्युत्तर 
12
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
13
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
14
काँग्रेसला ४० जागा मिळणेही अवघड आहे; पाच वर्षांत पाच पंतप्रधान बघावे लागतील - शाह
15
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
16
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
17
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
18
भाजपमुळे बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाईने जनता त्रस्त - प्रियांका गांधी
19
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
20
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले

टंचाई निवारणासाठी अधिकारी, ग्रामसेवकांत समन्वय आवश्यक- नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 3:23 PM

वैभववाडी : आपण टोलवाटोलवी करतो किंवा अपुरी माहिती देतो; तेव्हा जनतेचा आपल्यावरचा विश्वास कमी होऊ लागतो. त्यामुळे अधिकारी आणि ग्रामसेवकांनी आपसात समन्वय ठेवून ग्रामस्थांना विश्वासात घ्या.

वैभववाडी : आपण टोलवाटोलवी करतो किंवा अपुरी माहिती देतो; तेव्हा जनतेचा आपल्यावरचा विश्वास कमी होऊ लागतो. त्यामुळे अधिकारी आणि ग्रामसेवकांनी आपसात समन्वय ठेवून ग्रामस्थांना विश्वासात घ्या. तरच तालुक्यातील पाण्याचा प्रश्न चांगल्या पद्धतीने सुटू शकतो. यावर्षीचा टंचाई आराखडा बनविताना आधीची मंजूर कामे पूर्ण करून घेणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे, असे मत आमदार नितेश राणे यांनी पाणीटंचाई आराखडा नियोजन सभेत व्यक्त केले.येथील पंचायत समितीच्या सभागृहात पाणीटंचाई आराखड्याची सभा झाली. यावेळी तहसीलदार संतोष जाधव, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती लक्ष्मण रावराणे, उपसभापती हर्षदा हरयाण, प्रभारी गटविकास अधिकारी डॉ. वैभव सापळे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, पल्लवी झिमाळ, पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर पाटील उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला आमदार राणे यांनी गेल्या वर्षीच्या टंचाई आराखड्यातील मंजूर कामांच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यामध्ये बरीच कामे न झाल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत माहिती घेत असताना अधिकारी आणि ग्रामसेवकांच्या माहितीत विसंगती आढळली. त्यामुळे अधिकारी आणि ग्रामसेवकांमध्ये समन्वय नसल्यामुळेच पाण्याचा प्रश्न प्रलंबित राहत असल्याचे  उपस्थितांच्या निदर्शनास आणून देत चुकीची माहिती देऊन लोकप्रतिनिधींची दिशाभूल करता हा आमचा अपमान नाही का? असे खडे बोल राणे यांनी अधिका-यांना सुनावले. तांत्रिक अडचणीमुळे गेल्या वर्षीच्या आराखड्यातील न झालेली टंचाईची कामे यावर्षीच्या आराखड्यात प्राधान्याने घेण्याची सूचना करताना अडचणींवर उपायही सुचवा. नुसती कारणे सांगत बसू नका, असेही आमदार राणे यांनी प्रशासनाला सुनावले. पाणीटंचाईच्या कामात कुचराई करणा-या एकावर तरी निलंबनाची कारवाई करा. त्याशिवाय सगळे सरळ होणार नाहीत, अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली.गेल्या वर्षीच्या टंचाई आराखड्यात मंजूर असलेली परंतु अद्याप सुरू न झालेली कामे येत्या आठ दिवसांत सुरू करून डिसेंबर अखेर पूर्ण करण्याची ग्वाही देताना टंचाई आराखडा सभेला मोजकेच सरपंच उपस्थित राहिल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत पुढच्या सभेला सरपंच व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार राणे यांनी केले.नव्या राष्ट्रपतींचाही सन्मान करा !सभागृहात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि माजी राष्ट्रपतींची प्रतिमा दिसते. परंतु नव्या राष्ट्रपतींची निवड होऊन बरेच दिवस झाले. तरी त्यांची प्रतिमा सभागृहात दिसत नाही. पंचायत समितीत सत्ताबदल होताच ज्या तत्परतेने नारायण राणेंच्या प्रतिमा काढल्या ती तत्परता नव्या राष्ट्रपतींच्या बाबतीत येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे दिसत नाही. नव्या राष्ट्रपतींचीही प्रतिमा तात्काळ सभागृहात लावून त्यांचाही सन्मान करा, असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला. पाणीटंचाई आराखडा नियोजनाची सभा आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात झाली. यावेळी तहसीलदार संतोष जाधव, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती लक्ष्मण रावराणे, गटविकास अधिकारी डॉ. वैभव सापळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे