शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

नव्या कचरापेट्या बसविणार

By admin | Updated: November 18, 2014 23:22 IST

कणकवली नगरपंचायत : गॅल्व्हनाईज्ड पेट्यांसाठी दरपत्रक मागविले

कणकवली : शहरातील काही कचरापेट्यांची आयुष्य मर्यादा संपल्याने त्यांच्या जागी नव्या कचरापेट्या आणल्या जाणार आहेत. नगरपंचायतीकडून यासाठी दर मागवण्यात आले आहेत. नव्या कचरापेट्या या गॅल्व्हनाईज्ड प्रकारच्या असतील. त्या जास्त टिकाऊ असतील, असे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.कणकवलीत सध्या ३० कचरापेट्या आहेत. या कचरापेट्या लोखंडी पत्र्याच्या आहेत. यातील बहुतांश कचरापेट्या खराब झाल्या आहेत. यापूर्वी यातील काही पेट्या दुरूस्त करून घेण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या पुन्हा खराब झाल्या आहेत. त्यामुळे सुमारे २० कचरा पेट्यांच्या जागी नव्या गॅल्व्हनाईज्ड कचरापेट्या बसवल्या जातील. गॅल्व्हनाईज्ड कचरापेट्या लोखंडी पत्र्याच्या पेट्यांपेक्षा जास्त काळ टिकतील. कोंडवाड्यासाठी पुढाकार नाहीशहरात मोकाट गुरे फिरत असून ही गुरे कचरा पेट्यांतील कचरा बाहेर काढतात. मोकाट गुरांच्या समस्येवर अद्याप मार्ग निघालेला नाही. नगरपंचायतीकडून खासगी कोंडवाडा चालवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, कोंडवाडा चालवण्याचे निकष किचकट असल्याने कोणी कोंडवाडा चालवण्यासाठी पुढे येत नसल्याचे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.एकंदरीत कणकवली येथील कचऱ्याची समस्या मिटविण्याची जबाबदारी आता नगरपंचायतीवर येवून पडली आहे. शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)घनकचरा प्रकल्पाची उभारणी केव्हा?शहरात गोळा होणारा कचरा मुडेश्वर मैदानाच्या पुढे नागवे गावाच्या सीमेनजीक असलेल्या डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येत आहे. त्याठिकाणी घनकचरा प्रकल्प उभारण्याचे नगरपंचायतीच्या विचाराधीन आहे.हा प्रकल्प कंपनी सात वर्षे चालवणार आहे. त्यानंतर तो सक्षमपणे चालवणे परवडेल काय याचा नगरपंचायत विचार करत आहे.अस्वच्छताशहरातील अनेक कचरापेट्यांच्या बाहेर कचरा पडलेला दिसतो. या कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरते. रोगराई पसरण्याची भीतीही यामुळे निर्माण होत आहे. कुत्री या पेट्यांमध्ये शिरतात. तर गाईगुरे तोंड घालून कचरा बाहेर काढतात. तर काही नागरिकच कचरा पेटीबाहेर कचरा उडवून देतात. कुत्री आणि गुरे यांना रोखण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या कचरापेट्या आणण्याची गरज आहे.